• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • Navratri च्या चौथ्या दिवशी जगदंबा मातेच्या रुपात सजली ही अभिनेत्री; पाहा ओळखू येतेय का

Navratri च्या चौथ्या दिवशी जगदंबा मातेच्या रुपात सजली ही अभिनेत्री; पाहा ओळखू येतेय का

ही मराठमोळी अभिनेत्री नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ विविध रुपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. देवीच्या प्रत्येक रुपासोबतच तिचं माहात्म्यसुद्धा ती सांगणाताना दिसत आहे.

  • Share this:
    मुंबई, 10 ऑक्टोबर : शारदीय नवरात्रौत्सवाला ( Navratri 2021) सुरुवात झाली आहे. याच उत्सवाचे औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री 9 दिवस विविध देवींची रुप धारण करत हटके फोटोशुट करत असतात. दरम्यान, यामध्ये रात्रीत खेळ चाले शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीनेदेखील (navratri colours 2021) सहभाग दर्शवला आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ विविध रुपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. देवीच्या प्रत्येक रुपासोबतच तिचं माहात्म्यसुद्धा ती सांगणाताना देखील दिसत आहे. आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. आजच्या दिवशी केशरी रंगाचा मान आहे. शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरही देवीच्या नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आली आहे. चौथ्या दिवशी अपूर्वा नेमळेकर जगदंबा मातेच्या (apurva nemlekar in goddess jagdamba look) रुपात दिसते आहे. अपूर्वा नेमळेकरने इन्स्टावर जगदंबा मातेच्या रुपातील तिचे काही फोटो शेअर करत म्हटले आहे. आज नवरात्रीचा चौथा दिवस! व आजचा रंग नारींगी आहे. आज अपूर्वा देवी जगदंबा मातेच्या रूपाच सजलेली आहे. तिने पुढे म्हटले आहे की, जगदंबा माता (राशीनची देवी) मंदिर,अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी आहे. देवी यमाई या नावानेही प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना हेमाडपंती आहे. या मंदिराच बांधकाम शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. हलती दीपमाला हे या मंदिराच खास वैशिष्टय़ आहे. सेच यासाठी तिने तिच्या टिमचे कौतुक करत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
    शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रूप धारण केले होते. पहिला दिवशी फोटोशेअर करत तिने म्हटले की, कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखले जाते. वाचा : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हेमाच्या जागी दिसणारी ही नवी अभिनेत्री कोण ? दुसऱ्या दिवशी अपूर्वाने मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच मुंबादेवी हीचे रुप धारण केले आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटले की,नवरात्रीचा दुसरा दिवस ! रंग - हिरवा ! देवी- मुंबादेवी, मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता 🙏🙏 मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे. मुंबादेवी या देवीच्या नावावरुन शहराला मुंबई हे नाव पडले. मंदिराची स्थापना सर्वात आधी मूळ मुंबईकर असलेल्या मच्छीमारांनी (कोळी बांधव) केली. मुंबादेवी, सर्व संकटात मुंबईचे रक्षण करते अशी भावना आहे.🙏🙏मी अणि माझ्या टीमने केलेला ऐक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! विशेष म्हणजे देवीच्या वेगवेगळ्या रुपातले फोटो शेअर करताना देवस्थानाचं महत्त्वही ती शेअर करत आहे. वाचा : आलिया भट्ट आणि इम्रान हाश्मी यांचे आहेत कौटुंबिक संबंध! पाहा काय आहे दोघांचं नातं अपूर्वा नेमळेकरने नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धरण करत देवीच्या रूपातील फोटो पोस्ट करत म्हटले होते की, नवरात्रीचा तिसरा दिवस आहे व आजचा रंग करडा आहे. या दिवशी अपूर्वाने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केले आहे. तिने पुढे म्हटले आहे की, जया दुर्गा परमेश्वरी मंदिर कर्नाटकात उडपी येथे आहे. अंबा परमेश्वरी,चामुनडेश्वरी,ओम शक्ति, दुर्गा, सरस्वती, काली अशी तिची रूपे आहेत. स्कंध पुराणात याचा उल्लेख आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published: