PulwamaTerror Attack : सोनी चॅनेलनं सिद्धूची केली हकालपट्टी, कपिलच्या शोमध्ये आता नवी एंट्री

PulwamaTerror Attack : सोनी चॅनेलनं सिद्धूची केली हकालपट्टी, कपिलच्या शोमध्ये आता नवी एंट्री

पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी जे वक्तव्य केलं, त्याचा सगळीकडून निषेध होत होता. जनतेच्या या रोषामुळे सोनीनं नवज्योत सिंग सिद्धू यांना द कपिल शर्मा शोमधून काढण्याचा निर्णय घेतलाय.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी जे वक्तव्य केलं, त्याचा सगळीकडून निषेध होत होता. कपिल शर्मा शोमध्ये सिद्धूची मोठी भूमिका असते. तो शो एकतर बंद करावा किंवा त्यातून सिद्धू यांना काढून टाकावं अशी प्रेक्षक जोरदार मागणी सुरू होती. जनतेच्या या रोषामुळे सोनीनं नवज्योत सिंग सिद्धू यांना द कपिल शर्मा शोमधून काढण्याचा निर्णय घेतलाय.  सिद्धूच्या जागी आता अभिनेत्री अर्चना पुरण सिंगला घेतलं गेलंय.

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यावर नवज्योत सिंग सिद्धूनं प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो. पण काही मूठभर लोकांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल अख्ख्या देशाला कसं जबाबदार धरता येईल? अशा प्रकारे त्यांनी पाकिस्तानचा बचावच केला होता. यावर सिद्धू यांच्यावर प्रचंड टीका होतेय. प्रेक्षकांचा रोष त्यांनी ओढून घेतलाय.

सिद्धू यांनी दहशतवाद्यांना शिक्षा व्हायलाच हवी, असंही म्हटलं होतं. ते पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या शपथविधीलाही गेले होते. त्यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी नापसंती दर्शवली होती. जेव्हा सिद्धू आणि पाकिस्तानचे सेना प्रमुख यांनी एकमेकांना आलिंगन दिलेला फोटोही ट्रोल झाला होता.

आता प्रेक्षक सिद्धू यांना कपिल शर्माच्या शोमधून काढून टाकावं, नाही तर आम्ही शोवर बंदी घालू अशी मागणी करतायत. सध्या #Boycotthe kapil Sharma show हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.या घटनेनंतर पुलवामा येथे असलेल्या सर्व जवानांना, राज्य पोलीस दल आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतिपोरा येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. राज्यातील पुलवामा, शोपियां, कुलग्राम आणि श्रीनगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमधील हा गेल्या तीस वर्षांतला सर्वात मोठा मानला जात आहे.


सोनम कपूरनं पुन्हा एकदा बदललं नाव, कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2019 02:51 PM IST

ताज्या बातम्या