S M L

नवाज बनलाय बाबुमोशाय बंदुकबाज

नवाजुद्दीन सिद्दीकीनं 'बाबुमोशाय बंदुकबाज' या आपल्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं.

Sonali Deshpande | Updated On: Mar 30, 2017 01:25 PM IST

नवाज बनलाय बाबुमोशाय बंदुकबाज

30 मार्च : नवाजुद्दीन सिद्दीकीनं 'बाबुमोशाय बंदुकबाज' या आपल्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं.

या पोस्टरमध्ये नवाजचा चेहरा दिसत नाही. पण यात तो एका गरीब वर्गातला दाखवलाय, हे लक्षात येतं. कुशन नंदीनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं.

हातात डबा घेऊन तो टाॅयलेटला जातोय, असा फोटो आहे. प्रेक्षकांना नवाजच्या भूमिकेबद्दल बरीच उत्सुकता आहे. सिनेमात रोमान्स आणि काॅमेडी आहे. नवाजनं एका छोट्या काँट्रॅक्ट किलरची भूमिका साकारलीय.

आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमधून नवाजनं आपला ठसा उमटवलाय. रईस, हरामखोर या सिनेमांतल्या भूमिका गाजल्या. त्याचा 'मांझी द माऊंटनमॅन'ही खूप वेगळा ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close