60 तासांच्या मॅरेथाॅन नाट्य संमेलनाची आज सांगता

पहिल्यांदाच मराठी नाट्य संमेलन सलग 60 तास करण्याचा विडा उचलला होता संमेलनाध्यक्ष प्रसाद कांबळीनं. गेले दोन दिवस संमेलनातला प्रत्येक कार्यक्रम रंगतोय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 15, 2018 05:30 PM IST

60 तासांच्या मॅरेथाॅन नाट्य संमेलनाची आज सांगता

मुंबई, 15 जून : 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवसाची सुरुवात प्रतस्वर ह्या संगीतमय कार्यक्रमाने झाली.गायिका मंजुषा पाटील आणि सावनी शेंडे ह्यांनी आपल्या स्वरांनी दिवसाची सूरमय सुरुवात केली. त्यानंतर चित्र विचित्र, शिकस्त ए इश्क आणि त्या साडेसहा रुपयांचं काय झालं..? अश्या एकांकिकांचं सादरीकरण करण्यात आलं. अंध मुलांनी संगीत अपूर्व मेघदूत नाटकाचं सादरीकरण केलं.  संध्याकाळी समारोपाच्या कार्यक्रम पार पडेल ह्यासाठी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

पहिल्यांदाच मराठी नाट्य संमेलन सलग 60 तास करण्याचा विडा उचलला होता संमेलनाध्यक्ष प्रसाद कांबळीनं. गेले दोन दिवस संमेलनातला प्रत्येक कार्यक्रम रंगतोय. मराठी बाणा, संगीत सौभद्र, पंचरंगी पठ्ठेबापूराव, लोकककलांचा जागर, रंगबाजी सगळे कार्यक्रम रंगतदार झाले. बालनाट्यांनी धमाल केली. आणि तीन दिवस प्रत्येक पहाट दिग्गजांच्या स्वरांनी सुरेल झाली.

हेही वाचा

बाॅक्स आॅफिसच्या शर्यतीत 'रेस 3' कितवा येणार?

98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनत आज गो. ब. देवल पुरस्कारांचा वितरण करण्यात आलं. ह्यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी विद्याताई पटवर्धन ह्याना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांनी बाल रंगभूमीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे आवर्जून सांगितले. तर दुसरा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते रमेश भटकर ह्याना प्रदान करण्यात आला.

Loading...

ह्यावेळी देवल पुरस्करांवर संगीत देवबाभळी ह्या नाटकाने आपला ठसा उमटवला. सर्वोत्कृष्ट लेखन दिग्दर्शन संगीत अभिनय प्रकाशयोजना अश्या सर्व विभागात ह्या नाटकाला पुरस्कार मिळाले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार भारत जाधवला वेलकम जिंदगी ह्या नाटकासाठी मिळाला, तर ऋतुजा बागवेला अनन्या ह्या नाटकासाठी लक्षवेधी अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2018 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...