राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार पाहिजे, कलाकारांच्या हट्टामुळं नवा वाद!

राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार पाहिजे, कलाकारांच्या हट्टामुळं नवा वाद!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याच हस्ते पुरस्कार पाहिजे असा हट्ट कलाकारांनी केल्यानं 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभाला आज गालबोट लागलं.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.03 मे: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याच हस्ते पुरस्कार पाहिजे असा हट्ट कलाकारांनी केल्यानं 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभाला आज गालबोट लागलं. दरवर्षी राजधानी दिल्लीत अतिशय दिमाखात विज्ञान भवनात पुरस्कार समारंभ होत असतो.

हे वर्ष मात्र त्याला अपवाद ठरलं. राष्ट्रपती मोजकेच पुरस्कार देणार असल्याची माहिती पुढं आल्यानं हा वाद निर्माण झाला. हे प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत, दरवर्षी राष्ट्रपतींच्याच हस्ते ते दिले जातात त्यामुळं फक्त काहीच पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते का? असा सवाल कलाकारांनी उपस्थित केला. तर तासाभराच्याच पुरस्कार वितरण कार्यक्रमांना राष्ट्रपती उपस्थित राहतील हे बऱ्यात आधी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला कळविण्यात आले होते.

त्यामुळं या विषयावर वेळेवर प्रश्न उपस्थित करणं आश्चर्यकारक असल्याचं राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. समारंभाची सुरवात माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड यांच्या उपस्थितीत झाली. मध्यंतरानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी समारंभाला हजेरी लावली. तर काही कलाकारांनी समारंभावर बहिष्कार टाकला.

राष्ट्रीय पुरस्कार स्विकारणारे मराठी कलाकार

प्रसाद ओक - दिग्दर्शक - कच्चा लिंबू

Loading...

मंदार देवस्थळी - निर्माता - कच्चा लिंबू

निपुण धर्माधिकारी - लघुपट - धप्पा

अविनाश सोनवणे - ध्वनीमुद्रण - पावसाचा निबंध

नागराज मंजुळे - लघुपट - पावसाचा निबंध

रमण देवकर - सर्वोत्कृष्ट बालकलाकार - म्होरक्या

यशराज कऱ्हाडे - सर्वोत्कृष्ट बालकलाकार - म्होरक्या

सुयश शिंदे - दिग्दर्शक - मयत.

सर्वोत्कृष्ट संकलन - मृत्युभोग

राष्ट्रीय पुरस्कार न स्विकारणारे मराठी कलाकार

अमर देवकर - दिग्दर्शक - म्होरक्या - याचा टिकटॅक आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2018 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...