66th National Film Award : विकी कौशल आणि आयुष्यमान खुराना ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते

66th National Film Award : विकी कौशल आणि आयुष्यमान खुराना ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते

66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट : लोकसभा निवडणुकांमुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यंदा एप्रिलमध्ये होऊ शकली नव्हती. त्यामुळे आता 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा ‘अंधाधुंद’ला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा अवॉर्ड मिळाला आहे. श्रीराम राघवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. तसेच सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून उत्तराखंडची निवड करण्यात आली आहे. याशिवाय मराठीमध्ये भोंगा या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. या सिनेमाचं दिग्दर्शन शिवाजी पाटील यांनी केलं होतं. यावर्षी 33 फिचर सिनेमा आणि 23 नॉन फिचर सिनेमांना अवॉर्ड देण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- अंधाधुन (दिग्दर्शक-श्रीराम राघवन)

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- भोंगा (दिग्दर्शक-शिवाजी पाटील)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- आयुष्यमान खुराना (बधाई हो) आणि विकी कौशल (उरी: द सर्जिकल स्ट्राइक)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- किर्ती सुरेश (तेलुगू सिनेमा- महानती)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सीकरी (बधाई हो)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)

सर्वोत्कृष्ट पार्श्व गायक- अरिजीत सिंह (पद्मावत- बिंते दिल)

सर्वोत्कृष्ट पार्श्व गायिका- बिंदू मालिनी (नाथीचरामी-कन्नड सिनेमा)

सर्वोत्कृष्ट अ‍ॅडॉप्टेड स्क्रीनप्ले- अंधाधुन

सर्वोत्कृष्ट संवाद- तारीख (बंगाली)

सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम जिझायनर- इंद्राक्षी पटनायक, गौरांग शाह, अर्चना राव (तेलुगू सिनेमा- महानती)

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर- पद्मावत (घुमर)

सर्वोत्कृष्ट म्यूजिक डायरेक्टर- संजय लीला भन्साळी (पद्मावत)

राष्ट्रीय पुरस्कारांसाठी सिनेमांची यादी स्वतंत्र ज्यूरींकडून तयार केली जाते. त्यानंतर तज्ज्ञ निर्माते आणि सिने सृष्टीशी संबंधीत व्यक्तींकडून विजेत्यांची निवड केली जाते. ही यादी दरवर्षी एप्रिल महिन्यात जाहीर केली जाते मात्र यंदा या काळात लोकसभा निवडणुकीमुळे हे पुरस्कार एप्रिलमध्ये जाहीर होऊ शकले नव्हते.

======================================================================

VIDEO: 'खायला दिलं पण खायची इच्छा नाही, मला माझा प्रपंच पाहिजे'

First published: August 9, 2019, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading