मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

National Cinema Day : 'या' दिवशी चित्रपटाचं तिकीट मिळणार फक्त 75 रुपयात; तुम्ही तिकीट बुक केलं का?

National Cinema Day : 'या' दिवशी चित्रपटाचं तिकीट मिळणार फक्त 75 रुपयात; तुम्ही तिकीट बुक केलं का?

National Cinema Day

National Cinema Day

आधीच साजरा होणार हा राष्ट्रीय चित्रपट दिन 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे पुढे ढकलण्यात आला होता. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या कमाईला याचा फटका बसू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता तो दिवस अखेर आला आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 22 सप्टेंबर : भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय चित्रपट दिन' साजरा केला जाणार आहे. चित्रपटप्रेमींसाठी हा दिवस खूपच खास असणार आहे. कारण या दिवशी अनेक चित्रपटगृहात  प्रेक्षकांना केवळ 75 रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. याची तुम्हाला कल्पना असेलच. पण मागे साजरा होणार हा चित्रपट दिन 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे पुढे ढकलण्यात आला होता. 'ब्रह्मास्त्र'  चित्रपटाच्या कमाईला  याचा फटका बसू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता तो दिवस अखेर आला आहे.  23 सप्टेंबर  या दिवशी देशभरात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. 23 सप्टेंबर रोजी देशभरातील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांना केवळ 75 रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. 23 सप्टेंबर रोजी प्रेक्षक विक्रमी संख्येने चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे वळतील अशी अपेक्षा आहे. भारतीय मल्टिप्लेक्स प्राधिकरणाने (MAI) 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त देशातील 4000 स्क्रीनवर केवळ 75 रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे खरेदी करण्याची ऑफर आणली आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त शुक्रवारी प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये विक्रमी संख्येने आपली उपस्थिती नोंदवता येईल. या दिवशी चित्रपटाच्या तिकिटांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग दमदार होत असल्याचे सांगितले जाते. हेही वाचा - Tanushree Dutta : तनुश्री दत्ताचा धक्कादायक खुलासा; म्हणाली 'अनेकदा मला ...' राष्ट्रीय चित्रपट दिनी होणार नवा विक्रम? मल्टीप्लेक्स अथॉरिटी ऑफ इंडिया (MAI) ने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, 'चित्रपटाच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग उत्कृष्ट झाले आहे आणि 23 सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहे एका वर्षात सर्वाधिक प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवू शकतात.' देशभरातील सिनेसृष्टी 'राष्ट्रीय चित्रपट दिना'च्या माध्यमातून प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असून त्यांना कुटुंबासह चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. MAI ने निवेदनात पुढे लिहिले की, 'PVR, INOX, Cinepolis, Carnival, Mirage, Citypride, Asia, Mukta A2, Movie Time, Wave, M2K आणि Delight सारख्या मल्टिप्लेक्सनेही या उत्सवात सामील होण्यास सहमती दर्शवली आहे.' के ट्विटर हँडलने हे विधान शेअर केले आहे. एका चिठ्ठीसह, ज्यावर लिहिले आहे, 'चीटर्स 'राष्ट्रीय चित्रपट दिना' दिवशी  विक्रमी शो होतील अशी  आशा आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनात  साऊथचे सिनेमे सहभागी होणार नाहीत चित्रपटगृहे आणि तिकिटांच्या किंमतीबाबतच्या राज्य नियमांमुळे, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ यासारख्या काही राज्यांतील चित्रपटगृहे 'राष्ट्रीय चित्रपट दिना'मध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. दरम्यान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळसह सर्व राज्यांतील सिनेमा राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त विशेष ऑफर देणार आहेत.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Marathi cinema

पुढील बातम्या