'देर आये, दुरुस्त आये' म्हणत अक्षय कुमारने मानले आभार

'देर आये, दुरुस्त आये' म्हणत अक्षय कुमारने मानले आभार

माझी पत्नी ट्विंकल नेहमी म्हणायची तुम्हाला पुरस्कार भेटत नाही

  • Share this:

 08 एप्रिल : नुकत्याच पार पडलेल्या 64व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये अक्षय कुमारला बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार 'रुस्तम' या चित्रपटासाठी मिळाला. आणि याच पुरस्काराबद्दल अक्षय कुमार याने ट्विटरवर त्याच्या चाहत्यांचे आणि स्पेशल ज्युरीचे आभार मानले.

अक्षयने ट्विट करत असे म्हटलं आहे की, बेस्ट अॅक्टरचा अवार्ड हा खरंच माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. त्याचसोबत अक्षय कुमारने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षयने सर्वांचे आभार मानले.

अक्षय म्हणतो, या चित्रपटासाठी भारतीय नौसैनिकाची भूमिका निभावने खरचं खूप अभिमानास्पद आहे. "आपल्या भारतीय नौसेनेचा यूनिफॉर्म परिधान करणे ही स्वत:साठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. माझी पत्नी ट्विंकल नेहमी म्हणायची तुम्हाला पुरस्कार भेटत नाहीतर पुरस्कार सोहळ्याला कशाला जातात. पण अखेर देर आय दुरूस्त आये असंच झालंय"

अक्षय कुमारने हा पुरस्कार आपल्या आई-वडिलांना आणि खास करुन त्याची पत्नी ट्विंकलला समर्पित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 09:57 PM IST

ताज्या बातम्या