असं म्हटलं जातं की कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करण्यासाठी राजकुमार गुरूग्रामहून दिल्लीला चक्क सायकलवरून येत असे. तो क्षितीज रेपर्टर आणि श्रीराम सेंटरसोबत नाटक करत असे. त्याने आपलं पदवीचं शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीच्या सनातन कॉलेजमधून पूर्ण केलं होतं. (हे वाचा: BREAKING NEWS : बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ED कडून चौकशी सुरू ) राजकुमार रावला हे यश इतक्या सहजासहजी नाही मिळालं त्यासाठी त्याने खुपचं कष्ट घेतले आहेत. त्याने आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. की त्याला ऑडीशनमध्ये अनेकवेळा नकार मिळाला होता. त्यावेळी त्याच्या खिशात पैसेसुद्धा नसायचे. एक वेळ राजकुमारने म्हटलं होतं मी माझ्या वाट्यातून 7 हजार रुपये देत असे आणि ती रक्कम माझ्यासाठी खुपचं मोठी होती. एकवेळ असं झालं होतं, की माझ्या खात्यात फक्त 18 रुपये राहिले होते आणि माझ्या मित्राच्या खात्यात 23 रुपये. (हे वाचा: आलिया भट्टचा मस्तमौला अंदाज; PHOTO पाहून रणवीर सिंगही झाला फिदा!) राजकुमार रावने आपल्या कारकिर्दीची सुरुवात लव्ह सेक्स और धोका मधून केली होती. तसेच त्याने शैतान, शादी मै जरूर आना काय पो छे यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या शाहिद या चित्रपटासाठी तर त्याला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment