'गानसरस्वती'ला नामवंतांनी वाहिली आदरांजली

'गानसरस्वती'ला नामवंतांनी वाहिली आदरांजली

किशोरीताईंच्या निधनाने भारतातील संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, अनेक नामवंतांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

  • Share this:

04 एप्रिल :   ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांचं निधन झालं. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील राहत्या घरी सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास किशोरी आमोणकर यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भारतातील संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, अनेक नामवंतांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

‘किशोरी आमोणकर जी यांचा स्वर्गवास झाल्याचं ऐकून मला अत्यंत दुःख झालं. त्या एक असामान्य गायिका होत्या. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत जगताची मोठी हानी झाली आहे. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो’ अशा भावना गानकोकिळा लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

तर, किशोरी आमोणकर यांच्या निधनानं भारतीय शास्त्रीय संगीताचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालंय. त्यांच्या जाण्यानं मला अतीव दुःख झालंय. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहे.

किशोरीताईंच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय भावना व्यक्ते केल्यात आहेत. 'किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाने प्रयोगशीलता व संवेदनांना जपणाऱ्या एका ख्यातनाम आणि महान शास्त्रीय गायिकेला आपण मुकलो आहोत.', असं ते म्हणाले आहेत.

शबाना आझमींनीही ट्विटवरून दुःख व्यक्तं केलं आहे. 'हे नुकसान खूप मोठं आहे. मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. किशोरी आमोणकर यांचं गाणं मला थेट ऐकता आलं अशा काळात मी जगले हे माझं खूप मोठं भाग्य आहे.' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

First Published: Apr 4, 2017 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading