Home /News /entertainment /

हार्दिक- नताशाचे एंगेजमेंटचे फोटो बघून Ex बॉयफ्रेंड म्हणाला...

हार्दिक- नताशाचे एंगेजमेंटचे फोटो बघून Ex बॉयफ्रेंड म्हणाला...

ऑलराउंडर हार्दिक पांडेचं नाव नताशाच्या (Natasa Stankovic)अगोदर अभिनेत्री उर्वशी रौतेलासह आणखी काही मुलींबरोबर जोडलं गेलं होतं.

    भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. हार्दिक आणि नताशा स्टान्कोविच (Hardik Pandya and Natasa Stankovic Engagement) यांच्या एंगेजमेंटचा रोमँटिक VIDEO सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर त्यांच्या अनेक चाहत्यांच्या कमेंट्स आहेत. नताशाच्या एक्स बॉयफ्रेंडनेही हा व्हिडिओ पाहून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ऑलराउंडर हार्दिक पांडेचं नाव नताशाच्या (Natasa Stankovic)अगोदर अभिनेत्री उर्वशी रौतेलासह आणखी काही मुलींबरोबर जोडलं गेलं होतं. नताशा स्वतः मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करते. नताशाही हार्दिक आयुष्यात येण्याअगोदर रिलेशनशिपमध्ये होती. टीव्ही अभिनेता अली गोनीबरोबर तिचं अफेअर सुरू असल्याच्या बातम्या होत्या. समुद्रात मधोमध बोटीमध्ये रोमँटिक वातावरणात हार्दिकनं कसं प्रपोज केलं, याचा व्हिडिओ नताशाने तिच्या Instagram अकाउंटवरून शेअर केला आहे. त्या व्हिडिओखाली अली गोनी यानंही कमेंट केली आहे. लाल बदामांच्या इमोजी टाकून अलीने नताशाचं अभिनंदन केलं आहे. नताशा आणि अली यांनी नच बलिए या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. एक्स कपल म्हणूनच ही जोडी टीव्हीवर दिसली होती. 'साऱ्या हिंदुस्तान'ला कळवलं नव्या वर्षाच्या आधी हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर नताशासोबत एक फोटो शेअर केला होता.  पण 1 तारखेला संध्याकाळी त्याने आणखी काही फोटो शेअर करत आपली कमिटमेंट सिद्ध केली. Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. 01.01.2020 ❤️ #engaged असं लिहित त्यानं फोटो शेअर केले आहेत. रोमँटिक गाण्याच्या सुरात दोघं नाचताना दिसत आहेत. हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नताशा आणि हार्दिक नवीन वर्षाची सुरुवात अशा रोमँटिक अंदाजात करताना दिसले.
     
    View this post on Instagram
     

    Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. 01.01.2020 ❤️ #engaged

    A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

    पांड्याने सकाळी शेअर केलेल्या फोटोसोबत एक कॅप्शन दिली होती. त्यात म्हटलं होतं की, नव्या वर्षाची सुरुवात माझ्या 'फायरवर्क'सोबत. यासोबत त्याने लव्हचा इमोजीसुद्धा शेअर केला होता. त्याच्या या फोटोवर भारताच्या क्रिकेटपटूंसह पांड्याच्या मित्र-मैत्रीणींनी कमेंट केल्या. त्यानंतर संध्याकाळी हार्दिक हार्दिकने आणखी काही फोटो शेअर केले.  
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Hardik pandya

    पुढील बातम्या