S M L
Football World Cup 2018

'नशीबवान' निर्मात्यांना मूळ लेखकाचा विसर, लेखकाने घेतला आक्षेप

पुणे अांतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या 'नशीबवान' या मराठी सिनेमाच्या निर्मात्यावर कथेला योग्य श्रेय न दिल्याचा आरोप झालाय.

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2018 04:55 PM IST

'नशीबवान' निर्मात्यांना मूळ लेखकाचा विसर, लेखकाने घेतला आक्षेप

13 जानेवारी : पुणे अांतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या 'नशीबवान' या मराठी सिनेमाच्या निर्मात्यावर कथेला योग्य श्रेय न दिल्याचा आरोप झालाय. या सिनेमाच्या पोस्टरवर मूळ लेखकाला श्रेय दिलं नसल्याचं पुढे आल्याने हा वाद वाढलाय.

'नशीबवान' या सिनेमाची कथा हिंदीतील ख्यातनाम कथालेखक उदय प्रकाश यांच्या 'दिल्ली की दिवार' या कथेवर आधारित आहे. मात्र सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाच्या पोस्टरवर त्यांचं नाव लिहिलं नसल्याने या वादाला सुरूवात झाली.

या प्रकरणी 'नशीबवान'चे दिग्दर्शक अमोल गोळे यांनी उदय प्रकाश यांच्याची संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांच्याशी करार पूर्ण होणं बाकी असल्याचं स्पष्ट केलंय. तसंच सिनेमाच्या श्रेयनामावलीत उदय प्रकाश यांचं नाव असल्याचं सांगितलं. मात्र यावर उत्तर देताना सिनेमा बनवल्यानंतर त्याच्या मूळ लेखकाचं नावं देण्याचं औदार्य निर्माता-दिग्दर्शकांनी दाखवायला हवं असं मत उदय प्रकाश यांनी व्यक्त केलंय.

दरम्यान, सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून त्यात हा सिनेमा उदय प्रकाश यांच्या कथेवर आधारित असल्याचं त्यावर स्पष्टपणे लिहिण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2018 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close