नर्गिस यांनी ब्लेडनं हात कापून घेत केला होता आत्महत्येचा प्रयत्न, वाचा काय होतं कारण

नर्गिस यांनी ब्लेडनं हात कापून घेत केला होता आत्महत्येचा प्रयत्न, वाचा काय होतं कारण

नर्गिस यांनी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा तर त्यांनी आपल्या हातावर ब्लेडनं वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

  • Share this:

मुंबई, 1 जून : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आज जयंती. आज नर्गिस या जगात नसल्या तरीही त्यांच्या खऱ्या आयुष्यातली कहाणी आजही सर्वासोबत आहे. नर्गिस यांचं खरं नाव कनीज फातिमा राशिद असं होतं. घरात त्यांची आई अभिनेत्री असल्यानं फिल्मी वातावरण होतंच. पण नर्गिस यांना अभिनयात अजिबात रस नव्हता. एक दिवस त्यांच्या आईनं त्यांना स्क्रीन टेस्टसाठी दिग्दर्शक महबूब खानकडे जायला सांगितलं. नर्गिस इच्छेविरूद्ध तिथे गेल्या त्यांना वाटलं जर मी स्क्रीन टेस्ट पास केली नाही तर मला अभिनेत्री व्हावं लागणार नाही. पण अखेर त्यांचा हा विचार फोल ठरला आणि तकदीर सिनेमासाठी त्यांना कास्ट करण्यात आलं.

नर्गिस यांचं बॉलिवूड करिअर सुरू झालं मात्र 1950 ते 1954 हा काळ त्यांच्यासाठी सर्वाधिक कठीण होता. या काळात रिलीज झालेले त्यांचे सिनेमे फ्लॉप ठरले. पण 1955 मध्ये आलेला 'श्री 420' हा राज कपूर यांच्यासोबतचा त्यांचा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी राज कपूर यांच्यासोबत 'बरसात', 'अंदाज', 'जान-पहचान', 'प्यार', 'आवारा अनहोनी', 'आशियाना', 'आह', 'धुन', 'पापी', 'श्री 420', 'जागते रहो', 'चोरी चोरी' या सिनेमांत काम केलं. या दरम्यान त्या राज कपूर यांच्या प्रेमात पडल्या पण ते नातं फार काळ टिकलं नाही.

96 किलोची सारा अली खान कशी झाली 'फॅट टू फिट'? अभिनेत्रीने शेअर केला VIDEO

'मदर इंडिया' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान नर्गिस यांना आगीच्या दुर्घटनेतून सुनील दत्तनी वाचवलं. या घटनेनंतर एका मुलाखतीत नर्गिस म्हणाल्या होत्या की, जुन्या नर्गिसचा मृत्यू झाला आणि नव्य नर्गिसचा जन्म झाला आहे. या घटनेनंतर नर्गिस सुनील दत्त यांच्या प्रेमात पडल्या. सुनील दत्त यांना राज कपूर आणि नर्गिस यांच्या नात्याची कल्पना होती. मात्र त्यांचं म्हणणं होतं की हे त्या वयातलं आकर्षण होतं.

कोरोना आणि किडनीच्या आजारानं प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं निधन

 

View this post on Instagram

 

The pillars of our family! I miss you Mom & Dad ♥️

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on

स्वतःच्या लग्नाच्या आधी नर्गिस यांनी आपल्या भावाचा संसार सुरळित होण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यानंतर भावानं नर्गिस यांच्याकडे दुर्लक्ष केलं. नर्गिस आपलं दुःख सुनील दत्त यांना सांगत असतं पण सुनील दत्त यांच्याकडून त्यांना कोणतचं उत्तर मिळत नव्हतं अशात त्यांनी अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एकदा तर त्यांनी हात कापून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण यातून त्या वाचल्या आणि मग सुनील दत्त आणि नर्गिस यांचं लग्न झालं.

श्रीदेवींनी वयाच्या पन्नाशीत केलं होतं BOLD फोटोशूट, रातोरात झाले Photo Viral

First published: June 1, 2020, 9:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading