आता मोदींच्या वेब सीरिजमध्ये दिसेल मोदींनी लिहिलेली कविता

आता मोदींच्या वेब सीरिजमध्ये दिसेल मोदींनी लिहिलेली कविता

नरेंद्र मोदींच्या ‘श्याम के रोगन रेले’ या कवितेचा वापर सीरिजमध्ये केला आणि एक सुंदर गीत तयार केलं गेलं आहे.

  • Share this:

मुंबई, २६ मार्च- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या कविता ‘मोदी- द जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ नावाच्या वेबसीरिजमध्ये वापरण्यात आल्या आहेत. या वेब सीरिजची कथा मोदी यांच्या जीवनावर आधारित असून १० भागांची ही सीरिज असणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी म्हटलं की, ‘जेव्हा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याशी निगडीत गोष्टींचा अभ्यास करत होतो, तेव्हा आम्हाला त्यांनी लिहिलेल्या कविता मिळाल्या. या कवितांचा वापर सीरिजमध्ये नक्की करता येईल असं आम्हाला वाटलं.’

पुढे शुक्ला म्हणाले की, ‘म्हणून आम्ही ‘श्याम के रोगन रेले’ या कवितेचा वापर सीरिजमध्ये केला आणि एक सुंदर गीत तयार केलं.’ मूळ सीरिज मिहिर भूता आणि राधिका आनंद यांनी लिहिली आहे. प्रत्येक भाग हा ३५ ते ४० मिनिटांचा असणार आहे. यात मोदींच्या आयुष्याशी निगडीत अनेक घटना दाखवण्यात येतील.

या वेब सीरिजशिवाय पंतप्रधान मोदी यांचा बायोपिकही ५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. सध्या या सिनेमाचा ट्रेलर आणि मैं देश नहीं मिटने दूंगा हे गाणं सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे. सिनेमात विवेक ओबेरॉय मोदींची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

बरखा बिष्ट ही मोदींच्या पत्नीची अर्थात जसोदाबेन यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर झरीना वहाब मोदींच्या आईची हीराबेन यांची व्यक्तिरेखा वठवणार आहेत. मनोज जोशी सिनेमात अमित शहा यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. सुरेश ओबेरॉय आणि संदीप सिंग यांनी या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली आहे. या सिनेमात मोदींच्या फक्त खासगी आयुष्याबद्दलच लोकांना सांगितले असे नसून एक कार्यकर्ता ते भारताचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

VIDEO : बारामतीच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांच्याबद्दल सुप्रिया सुळे म्हणतात...

First published: March 25, 2019, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading