S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

'या' चित्रपटात मोदी देणार त्यांचा आवाज

हा सिनेमा 14 भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे. या सिनेमाचं स्क्रीनिंग जानेवारीत जर्मन अॅँन्ड फ्रेंच फिल्म फेस्टीवलमध्ये होईल. नंतर हा सिनेमा देशभरातील अनेक शाळांमध्ये दाखवला जाईल.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 2, 2017 02:07 PM IST

'या' चित्रपटात मोदी देणार त्यांचा आवाज

02 ऑक्टोबर: राजकारणात आपला ठसा उमटवल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी रूपेरी पडद्याच्या दुनियेत पर्दापण करत आहेत. लवकरच एका चित्रपटाला नरेंद्र मोदी आवाज देणार आहे.

मोदी कुठल्या बॉलिवूडच्या चित्रपटात काम करणार नाही आहेत. तर केंद्र सरकारने चालवलेल्या बेटी बचाव बेटी पढाव अभियानावर एक चित्रपट बनतो आहे. हा चित्रपट हे अभियान शेवटपर्यंत पोचावे म्हणून बनवला जातो आहे. या चित्रपटाला मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस संगीत देणार आहे. या चित्रपटात किरण बेदी, अमिताभ बच्चन श्री श्री रविशंकर पाहुणे कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत. रामकुमार शेंडगे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर तम्मना भाटियाही या सिनेमात दिसू शकते.

हा सिनेमा 14 भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे. या सिनेमाचं स्क्रीनिंग जानेवारीत जर्मन अॅँन्ड फ्रेंच फिल्म फेस्टीवलमध्ये होईल. नंतर हा सिनेमा देशभरातील अनेक शाळांमध्ये दाखवला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close