नरेंद्र मोदींबद्दल कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य

नरेंद्र मोदींबद्दल कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य

आज मोदी एवढ्या उंचीवर त्यांच्या आई- वडिलांमुळे गेले नाहीयेत

  • Share this:

आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड क्वीन कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. शनिवारी कंगनाने पंतप्रधानानाच्या उमेदवारीसाठी नरेंद्र मोदीच योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे. कंगना म्हणाली की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही नरेंद्र मोदीच जिंकून आले पाहिजेत. कारण देशाला खड्ड्यातून वाचवण्यासाठी फक्त पाच वर्ष उपयोगाचे नाहीत. शनिवारी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर चित्रीत करण्यात आलेल्या 'चलो जीते हैं' या लघुपटाच्या प्रीमिअरला कंगना आली होती. मंगेश हदावले दिग्दर्शित हा लघुपट २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यात मोदींचे बालपण कसे होते ते दाखवण्यात येणार आहे.

कंगनाने यावेळी मोदींचे भरभरून कौतुक केले. एवढेच नाही तर कंगना पुढे म्हणाली की, आज मोदी एवढ्या उंचीवर त्यांच्या आई- वडिलांमुळे गेले नाहीयेत, तर त्यांच्या मेहनत मोदींना इथपर्यंत पोहोचवले आहे. कंगना राजकीय परिस्थीवर सहसा बोलत नाही. पण मोदी याला अपवाद ठरले. कंगनाने पहिल्यांदा राजकीय परिस्थीवर भाष्य करत २०१९ च्या लोकसभा निवडणूकीबदद्ल दिलखुलास चर्चा केली. कंगनासोबत अक्षय कुमार, गुलशन ग्रोवर, अमीषा पटेल आणि संजय खान यांसारखे कलाकार प्रिमिअरला उपस्थित होते. रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनीही हा लघुपट पाहिला. ३२ मिनिटांच्या या लघुपटाचे विशेष स्क्रिनिंग राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा-

आजपासून 'या' वस्तू स्वस्त, खरेदी करताना किंमत नक्की पहा!

रिलायन्स इंडस्ट्रिजचा एप्रिल ते जून या तिमाहीचा नफा 9 हजार 485 कोटींवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2018 09:38 AM IST

ताज्या बातम्या