मराठी अभिनेत्रीला एकता कपूरनं दिला मदतीचा हात; गंदी बातमधून केलं comeback

मराठी अभिनेत्रीला एकता कपूरनं दिला मदतीचा हात; गंदी बातमधून केलं comeback

लग्न करताच तिच्या करिअरला उतरती कळा लागली. अन् एक दिवस असाही आला जेव्हा काम मिळत नाही म्हणून तिनं थेट देशच सोडून दिला.

  • Share this:

मुंबई 16 एप्रिल: ‘क्योकी सास भी कभी बहु थी’ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) मालिकेतून घराघरात पोहोचलेली नारायणी शास्त्री (Narayani Shastri) ही एकेकाळी छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. मादक अदा आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिनं स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं होतं. विशेष म्हणजे तत्कालिन सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक ती होती. मात्र यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीचं करिअर लग्न केल्यामुळं संपलं. लग्न करताच तिच्या करिअरला उतरती कळा लागली. अन् एक दिवस असाही आला जेव्हा काम मिळत नाही म्हणून तिनं थेट देशच सोडून दिला.

नारायणीचा आज वाढदिवस आहे. 16 एप्रिल 1978 पुण्यातील एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला होता. रंगभूमीवर अभिनय करुन तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याच दरम्यान तिला कहानी सात फेरों की या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी ती केवळ 21 वर्षांची होती. ही मालिका काही दिर्घ काळ चालली नाही. परंतु या मालिकेत तिनं केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती केली गेली. अन् यामुळंच तिला क्योकी सास भी कभी बहु थी या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिची भूमिका फारशी मोठी नव्हती परंतु तरी देखील आपल्या सुंदर चेहऱ्यामुळं तिनं प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. याच दरम्यान तिनं एक बोल्ड फोटोशूट करुन खळबळ देखील माजवली होती.

अवश्य पाहा - या उत्तरामुळं लारा दत्ता होती ‘मिस युनिव्हर्स’; उत्तर ऐकून परीक्षकही पडले सुन्न

रुपेरी पडद्यावर संस्कारी पण खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस अशा अंदाजात राहणाऱ्या नारायणीनं पुढे संजीवनी, कुमकुम, सीआयडी, आहट यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. पण याच काळात तिनं एका विदेशी व्यक्तीसोबत लग्न केलं. अन् या नंतर का कुणास जाणो तिच्या करिअरला उतरती कळा लागली. निर्मात्यांनी तिला काम देणं बंद केलं. काही तत्कालिन निर्मात्यांच्या मते लग्न केल्यामुळं ती विदेशी नागरिक झाली होती अन् ती वर्किंग वीजावर काम करायची. याचे पैसे निर्मात्यांनीच द्यावे अशी मागणी ती करत होती. त्यामुळं आर्थिक मतभेदांमुळं तिला काम देण्यास नकार दिला जात होता. शिवाय ज्या मालिकांमध्ये तिनं काम केलं तिथंही तिला दुह्यम भूमिका मिळत होत्या. अखेर बेरोजगारीला वैतागून नारायणीनं काही वर्षांकरीता देशच सोडून दिला. तिनं आपलं लक्ष संसारावर केंद्रित केलं. अलिकडेच तिनं एकता कपूरच्या गंदी बात या वेब सीरिजमधून पुनरागमन केलं.

Published by: Mandar Gurav
First published: April 16, 2021, 11:32 AM IST

ताज्या बातम्या