मुंबई, 30 जानेवारी : अलिकडच्या काळात बॉक्स ऑफिसवर साऊथ इंडियन सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. 2022मध्ये साऊथ इंडियन सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवला. RRR, पुष्पा आणि कांतारा या साऊथ सिनेमांनी 2022हे वर्ष गाजवलं. त्यातही पुष्पाचा सिलसिला आजही पाहायला मिळतोय. पण आता पुष्पाला टक्कर देण्यासाठी नवा सिनेमा येऊ घातला आहे. 'दसरा' या नव्या साऊथ सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. हा सिनेमा पाहून पुष्पा सिनेमाचा प्रेक्षकांना विसर पडेल असं म्हटलं जात आहे.
दसरा हा मुळ तेलुगू भाषेतील सिनेमा हिंदीसह तमिळ मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनीही सिनेमाचं कौतुक केलं आहे. साऊथ अभिनेता नानी हा सिनेमात प्रमुख भूमिकेत असणार आहे. टीझरमध्ये धमाकेदार अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. वरकरणी टीझर पुष्पा सिनेमासारखाच दिसत असला तरी सिनेमाची कथा वेगळी असणार आहे.
हेही वाचा - Pathaan Box Office Collection : पहिल्या दिवशी 55, पाचव्या दिवशी हॅट्रिकच केली; पठाणची 500 कोटींची कमाई
टीझरमध्ये पुष्पा सिनेमाची झलक पाहायला मिळत आहे. सिनेमाचं म्युझिक देखील पुष्पा सिनेमाची आठवण करून देत आहेत. एका छोट्या गावातील मुलगा जो गावातील लोकांची मदत करण्यासाठी लढताना दिसत आहे. सिनेमात रोमान्स पाहायला मिळणार की नाही याची अद्याप माहिती नाही पण सिनेमा जबरदस्त अँक्शन सीन्सनं भरलेला आहे हे मात्र नक्की. कोळशाच्या खाणीच्या मधोमध वसलेलं एक गाव आहे ज्यात कोण राम आणि कोण रावण हे कोणालाच माहिती नाही. हातात विळा घेऊन सगळेच एकमेकांचं रक्त पिण्यासाठी तहानलेले दिसत आहेत.
आरआरआर सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी सिनेमाचा टीझर पाहून पसंती दर्शवली आहे. त्यांनी टीझर शेअर केला आहे. त्याचप्रमाणे अभिनेता धनुष, शाहिद कपूर, दलकीर सलमान, रक्षित शेट्टी यांनीही सिनेमाचा टीझर शेअर करत पसंती दर्शवली आहे.
दसरा सिनेमाचं दिग्दर्शन श्रीकांता ओडेला यांनी केलं आहे. सिनेमात कीर्ती सुरेश, साई कुमार आणि शआइन टॉम चाको दिसणार आहे. सिनेमा 30 मार्चला देशभरात रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South film, South indian actor