मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Nandita Patkar : 'मला वाटलं मी खूप गोंधळ घालेन पण...' नंदिताने शेअर केला 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' चा 'तो' किस्सा

Nandita Patkar : 'मला वाटलं मी खूप गोंधळ घालेन पण...' नंदिताने शेअर केला 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' चा 'तो' किस्सा

Nandita Patkar

Nandita Patkar

आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाने इतिहास रचला होता. महाराष्ट्रात तेव्हा फक्त ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटाचाच बोलबाला होता. एकदम कडक असा चित्रपट सगळ्याच प्रेक्षकांना आवडला होता. अभिनेता सुबोध भावे यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 9 ऑगस्ट :  'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाने इतिहास रचला होता. महाराष्ट्रात तेव्हा फक्त  ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटाचाच बोलबाला होता. एकदम कडक असा चित्रपट सगळ्याच प्रेक्षकांना आवडला होता. अभिनेता सुबोध भावे यांनी  डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली होती. अभिजीत देशपांडे यांनी काशिनाथ घाणेकर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमात सुबोध भावे, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, आनंद इंगळे, वैदही परशुराम, नंदिता पाटकर  अशा तगड्या कलाकारांनी  भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील संवाद, अभिनय जबरदस्त होता. या सिनेमात काशिनाथ घाणेकर यांच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदिता पाटकर हिने आता या चित्रपटाविषयी एक थ्रोबॅक  फोटो पोस्ट केला आहे. नंदिताच्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. आता तिने एवढ्या दिवसानंतर या चित्रपटाविषयी आठवण शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे कि, 'काल माझी फोटो गॅलरी बघताना  मला अचानक हे फोटो दिसले आणि मी खूप नॉस्टॅल्जिक झाले. हा फोटो म्हणजे "आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर" मधील एक कठीण आणि महत्त्वाचा सीन आहे  जेव्हा हा प्रसंग  शूट केला  तेव्हा आम्हाला तो खूप घाई घाईत शूट करावा लागला.  कारण संध्याकाळ होती आणि अंधार पडणार होता. त्यामुळे खूप  घाईत हा सीन  शूट केला.  मी खूप टेन्शनमध्ये आणि नर्व्हस होते. मला वाटलं होतं की हा सीन  शूट करताना खूप गोंधळ घालेन पण, आमचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता.  आणि मी  हा सिन शूट केला.''
View this post on Instagram

A post shared by Nandita Patkar (@mi_nandita)

तिने पुढे लिहिले आहे कि, मी त्याच्याकडे सतत तक्रार करत राहिले पण त्याला नेहमीच माझ्याविषयी खात्री वाटत होती. त्यावेळी  तो फक्त हसायचा आणि मला म्हणायचा रिलीज होईपर्यंत थांब. तू काय केलं आहेस हे तुझ्या लक्षात येईल. आणि तो खरा होता. हेही वाचा - Daagdi Chaawl 2 : सलमान खानने दिल्या 'दगडी चाळ 2' चित्रपटाला शुभेच्छा; शेअर केला स्पेशल व्हिडीओ
अभिजीत तुझे खूप खूप आभार मला या चित्रपटाचा भाग बनवल्याबद्दल.  इतक्या छान  चित्रपटासाठी, या भूमिकेसाठी तुझे खूप खूप आभार.'' तिने पुढे ''या सीनला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल रसिकप्रेक्षकांचेही आभार मानले आहेत.
जेव्हा काशिनाथ घाणेकरांची पहिली बायको त्यांच्या प्रेयसीला भेटते तेव्हाचा हा सिन आहे. तो सीन शूट करण्यासाठी किती कष्ट लागले याविषयी तिने लिहिले होते. सध्या नंदिता स्टार प्रवाहावरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत सरिता हि महत्वाची भूमिका निभावली आहे.
First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment

पुढील बातम्या