Home /News /entertainment /

'या' थ्रिलर मराठी सिनेमाचा रिमेक थेट गुजरातीत?, परेश रावल दिसणार मुख्य भूमिकेत

'या' थ्रिलर मराठी सिनेमाचा रिमेक थेट गुजरातीत?, परेश रावल दिसणार मुख्य भूमिकेत

अनेक वर्षानंतर परेश रावल (Paresh Rawal) यांनी पदड्यावर पुनरागमन केलं आहे. हे ज्येष्ठ अभिनेते सध्या एका गुजराती चित्रपटातून सर्वांच्या भेटीला आले आहेत.

    मुंबई, 19 फेब्रुवारी- अनेक वर्षानंतर परेश रावल   (Paresh Rawal)  यांनी पदड्यावर पुनरागमन केलं आहे. हे ज्येष्ठ अभिनेते सध्या एका गुजराती चित्रपटातून सर्वांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाचं नाव 'डिअर फादर'   (Dear Father) असं आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्यांनतर आता हा चित्रपट नाना पाटेकर (Nana Patekar)   यांचा मराठी चित्रपट 'आपला माणूस' (Aapla Manus)  या चित्रपटाचा गुजराती रिमेक असल्याचं दिसत आहे. परेश रावल यांचा चित्रपट- ज्येष्ठ विनोदी अभिनेते अशी परेश रावल यांची ओळख आहे. त्यांनी विनोदी आणि गंभीर दोन्ही प्रकारच्या भूमिका तितक्याच ताकतीने साकारल्या आहेत. त्यांचा विनोदी अभिनय प्रेक्षकांना जास्त भावतो. त्यांनी अनेक विनोदी चित्रपट केले आहेत. गेली अनेक दिवस ते पदड्यापासू दूर होते. त्यांनतर आता त्यांनी धमाकेदार पुनरागमन केलं आहे. हा विनोदी चित्रपट नसून एक रहस्यमयी चित्रपट आहे. नुकतंच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये परेश रावल आपल्या मुलगा आणि सुनेसोबत राहताना दिसतात. त्यांच्यात दरोरोज खटकेसुद्धा उडत असतात. आणि अशातच एक दिवस परेश रावल बिल्डिंगवरून खाली पडतात आणि त्यांचा मृत्यू होता. आता ही नेमकी आत्महत्या आहे, अपघात की खून याचा तपास सुरु होतो. आणि त्यांचा तपास करण्यासाठी जे अधिकारी येतात ते परेश रावलच असतात. आता ते नेमके त्यांचे डुप्लिकेट आहेत की यामागे वेगळंच काही गुपित आहे अशी ही रहस्यमयी कथा आहे. हा चित्रपट उमंग व्यास यांनी दिग्दर्शित केला आहे. नाना पाटेकर यांचा 'आपला माणूस'- चार वर्षांपूर्वी अर्थातच 2018 मध्ये मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं 'आपला माणूस'. या चित्रपटाची कथा हुबबेहूब परेश रावल यांच्या चित्रपटासारखीच आहे. यामुळे हा गुजराती चित्रपट नाना पाटेकर यांच्या मराठी चित्रपटाचा रिमेक असल्याचं समजलं जात आहे. यामध्ये अभिनेता सुमित राघवनने नाना पाटेकर यांच्या मुलाची भूमिका साकारली होती . तर सतीश राजवाडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Gujrat, Marathi cinema, Marathi entertainment

    पुढील बातम्या