'या' सिनेमात नाना VS थलाइवा

'या' सिनेमात नाना VS थलाइवा

-will-act-as-a-villan-in-rajinikanths-film-kala

  • Share this:

08 जून : मराठी आणि हिंदी चित्रपटांचा ढाण्या वाघ म्हणजे नाना पाटेकर आणि तमिळ चित्रपटांमधला थलाईवा म्हणजे रजनीकांत...पण जर हे दोन दिग्गज कलाकार एकाच सेटवर एकामेकासमोर उभे ठाकले तर?    हे साध्य केलंय 'काला' या तमिळ सिनेमाने.

या सिनेमात नाना कडक आणि दुष्ट राजकारण्याची भूमिका साकारत आहेत. तर रजनीकांत त्यांचा कट्टर विरोधक असणार आहे. दोघांमध्ये लव अॅण्ड हेट रिलेशनशीप दिसणार आहे.

या चित्रपटात रजनीकांत मुंबईतल्या तमिळ लोकांच्या नेताय आणि त्यांच्यासाठी हक्काची लढाई लढतोय. 'कबाली'चे दिग्दर्शक पा. रंजीतच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तसंच हुमा कुरेशी,अंजली पाटील आणि पंकज त्रिपाठी ही या सिनेमात काम करत आहेत.

या चित्रपटाची निर्मिती धनुष करतोय. अस म्हंटल जातंय की, या सिनेमात तो एक छोटीशी भूमिका ही करेल.

First published: June 8, 2017, 9:31 PM IST

ताज्या बातम्या