स्थैर्य नसलेली मूठभर राजकारणी मंडळी गलिच्छ राजकारण करतात - नाना पाटेकर

स्थैर्य नसलेली मूठभर राजकारणी मंडळी गलिच्छ राजकारण करतात - नाना पाटेकर

अजय देवगण निर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित 'आपला मानूस' या सिनेमात नाना पाटेकर सीआयडी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसतील. यानिमित्त बोलताना शेवटी जातधर्मापलिकडे असलेला माणूस महत्त्वाचा, असं ते म्हणाले.

  • Share this:

19 जानेवारी : अजय देवगण निर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित 'आपला मानूस' या सिनेमात नाना पाटेकर सीआयडी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसतील. यानिमित्त बोलताना शेवटी जातधर्मापलिकडे असलेला माणूस महत्त्वाचा. मोर्चे करून काय साधणार जेव्हा आपण माणुसकी हरवत आहोत. कोण उपटसुंभे येतात आणि एक दिवसात गोंधळ  घालतात. असं बोलत नाना पाटेकर यांनी राजकारण्यांना टोला लगावला.

ते म्हणाले, 'मला असं वाटतं मूठभर राजकीय मंडळी ज्यांना काही राजकीय स्थैर्य राहिलं नाही, ते गलिच्छ राजकारण करतात. सगळं आपण वाटून खात होतो. बाबासाहेब माझे नाहीत का, शिवाजी माझे नाहीत का, महामानवांना चबुतऱ्यावर उभं करून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. बाबासाहेबांचे विचार आपण बाणवले पाहिजेत. नुसतं जय शिवाजी बोलून मराठा नाही होत.'

नाना परखडपणे म्हणाले, 'मला जातीचं ढिगळ लावू नका, माझ्याकडे माणूस म्हणून बघा.' पहा नाना पाटेकरांची पूर्ण मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2018 01:46 PM IST

ताज्या बातम्या