Home /News /entertainment /

Why I Killed Gandhi सिनेमातील वादावर नाना पाटेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "अमोल कोल्हेंनी नथुरामाची भूमिका केल्याने...."

Why I Killed Gandhi सिनेमातील वादावर नाना पाटेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "अमोल कोल्हेंनी नथुरामाची भूमिका केल्याने...."

या सर्व प्रकरणात आता अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी उडी घेतली आहे.

    मुंबई, 22 जानेवारी-   सध्या सोशल मीडियावर राजकीय-सांस्कृतिक वातावरण चांगलंच तापलं आहे. 'Why I Killed Gandhi' या चित्रपटामुळे एकच खळबळ उडाली आहे. या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे अभिनेते अमोल कोल्हे   (Dr. Amol Kolhe)  यांना अनेकांनी धारेवर धरलं आहे. तर काहींनी त्यांना समर्थन देत भूमिका केली म्हणून गांधी हत्येचं समर्थन केलं असं होत नाही. असा पवित्रा घेतला आहे. या सर्व प्रकरणात आता अभिनेते नाना पाटेकर   (Nana Patekar)  यांनी उडी घेतली आहे. अभिनेते नाना पाटेकर नेहमीच रोखठोक मत मांडताना दिसून येतात. त्यांनी आजपर्यंत अनेक विषयांवर आपलं मत मांडलं आहे. आजही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. सध्या 'Why I Killed Gandhi' या चित्रपटावरून जोरदार वाद सुरु आहे. या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली म्हणून कुणी अभिनेते अमोल कोल्हे यांना कडाडून विरोध करत आहेत. तर कुणी त्यांना पाठिंबा देत आहे. यासर्व प्रकरणात आता अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर आपलं मत मांडताना अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे, 'कुणी भूमिका केली म्हणून नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन करतंय असं होत नाही. मीसुद्धा 'लास्ट व्हाईस रॉय माउंट बॅटन' या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्या विचारांचं समर्थन करतो असं मुळीच होत नाही. तो फक्त अभिनय आहे. कुणी कोणती भूमिका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सध्या समाजात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर लक्ष देणं जास्त महत्वाचं असल्याचं देखील  त्यांनी म्हटलं आहे'. व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही - डॉ. अमोल कोल्हे कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा! याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा!"
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Marathi entertainment, Nana patekar

    पुढील बातम्या