मुंबई, 28 सप्टेंबर : बाॅलिवूडचे अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर 'आशिक बनाया आपने' फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2008साली विनयभंगाचे गंभीर आरोप केले होते. अनेकांनी तनुश्री दत्ताची बाजूही घेतली. पण आता अभिनेते नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताला नोटीस पाठवलीय. नानांच्या वकिलांनी सांगितलं, संध्याकाळपर्यंत तनुश्रीला ही नोटीस मिळेल.
नानाचे वकील राजेंद्र शिरोडकर म्हणाले, 'तनुश्रीनं चुकीचे आरोप केलेत. त्यामुळे त्या नोटीसीत तिला माफी मागायला सांगितलीय.'
2008 मध्ये 'हाॅर्न ओके प्लीज' या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरव्यवहार केला होता. मी त्यांना विरोध केला. पण त्यांनी याचा बदला घेण्यासाठी संपूर्ण चित्रपटात मला त्रास दिला, असा दावा तनुश्री दत्तानं केला होता. यावर ते म्हणाले, 'आम्ही दोघं सेटवर होतो आणि त्यावेळी आमच्या समोर 200 जण होते. मी काय बोलू यावर?'
तनुश्री दत्ता म्हणाली होती, 'नाना एवढ्यावर थांबले नाही. तर त्यांनी माझ्या कुटुंबालाही त्रास दिला. शुटिंगच्या नंतर मी घरी निघाले तेव्हा त्यांनी गाडीवर दगडफेक केली होती असा आरोपही तनुश्रीने केला. तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. त्या दिवशी सेटवर तणावपूर्ण वातावरण होतं.'
'मी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते पण माझी तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. उलट माझ्याच विरोधात उलटी तक्रार दाखल करण्यात आली होती असंही तिने सांगितलं होतं.
BIGG Boss 12: जसलीनला सर्व स्पर्धकांसमोर बिकीनीमध्ये पाहून अनुप जलोटांनी दिली ही प्रतिक्रिया