MeToo : तनुश्री दत्ता प्रकरणात अभिनेता नाना पाटेकर यांना पोलिसांकडून क्लिनचीट

तनुश्री दत्तानं MeToo मोहिमे अंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता.

News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2019 03:20 PM IST

MeToo : तनुश्री दत्ता प्रकरणात अभिनेता नाना पाटेकर यांना पोलिसांकडून क्लिनचीट

मुंबई, 13 जून : अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्याशी हॉर्न ओके प्लिजच्या सेटवर गैरवर्तन केल्याप्रकरणी नाना पाटेकर यांना क्लिन चिट मिळाली आहे. या प्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्तानं ओशिवरा पोलिस ठाण्यात नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा अहवाल अंधेरी न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र पोलिसांना नाना पाटेवर यांच्या विरोधात कोणताही ठेस पुरावा न सापल्यानं नाना पाटेवर यांना आता दिलासा मिळाला आहे.

'इन्शाअल्लाह'नंतर 'हा' महत्त्वाचा मुद्दा भन्साळी साकारणार मोठ्या पडद्यावर



काही महिन्यांपूर्वी तनुश्री दत्तानं MeToo मोहिमे अंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. ‘हॉर्न ओके प्लिज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी मला चुकीच्या पद्धातीनं स्पर्श केल्याचं तनुश्रीनं म्हटलं होतं. या सिनेमात आयटम साँग तनुश्री करत होती मात्र तिला या गाण्यातील काही स्टेपवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे सिनेमाच्या सेटवर प्रचंड गोंधळ माजला होता. त्यानंतर तनुश्री या सिनेमातून माघार घेतली आणि ती परदेशात निघून गेली. मात्र मागील वर्षी भारतात परतल्यावर तिनं नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली मात्र पोलिस तपासात हे सर्व आरोप कमकुवत असल्याचं तसेच नाना पाटेकर यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं दिसून आलं त्यामुळे नाना पाटेकर यांना आता दिलासा मिळाला आहे.

अ‍ॅक्शन... थ्रीलर... रोमांस, प्रभासच्या बहुचर्चित Saaho चा टीझर रिलीज

तनुश्री दत्तानं MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर हळूहळू बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नाव या मोहिमेत समोर आली. राजकुमार हिरानी, अलोक नाथ, विकास बहल यांच्यावरही आरोप झाले होते.


===========================================================================


Big Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री? ऐका काय म्हणाला भाईजान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 03:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close