मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /लियोनार्डो डिकॅप्रियोच्या हॉलिवूड सिनेमाला नानांनी दिला होता नकार; 15 वर्षांनी समोर आलं कारण

लियोनार्डो डिकॅप्रियोच्या हॉलिवूड सिनेमाला नानांनी दिला होता नकार; 15 वर्षांनी समोर आलं कारण

nana patekar

nana patekar

लियोनार्डो डिकॅप्रियो आणि रसेल क्रो यांच्या सिनेमात काम करण्यास नाना पाटेकर यांनी नकार दिला होता. कारण जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 फेब्रुवारी : अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर अनेक मराठी हिंदी तसेच इतर भाषेतील सिनेमात काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नानांच्या अभिनयाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांनी आजवर लाखो प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. एखाद्या कलाकाराचं स्वप्न असतं की त्यानं मराठी, बॉलिवूड, साऊथ तसंच हॉलिवूड सिनेमातही काम करावं. अभिनेता नाना पाटेकर यांनाही हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी चालून आली होती. मात्र त्यांनी हातात आलेला सिनेमा धुडकावून लावला होता. तब्बल 15 वर्षांनी ही बाब आता समोर आली आहे.

अनेक दर्जेदार भूमिका करणाऱ्या नानांनी थेट हॉलिवूड सिनेमा नाकारला होता. लियोनार्डो डिकॅप्रियो या हॉलिवूड सुपरस्टारनं नानांना एका सिनेमाची ऑफर दिली होती. पण नानांची तोंडावर सिनेमा करण्यास नकार दिला.  नानांनी नकार दिल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. हॉलिवूड सिनेमा नाकारण्यासाठी नानांनी दिलेल्या कारणानंही सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा - Valentines day 2023: आधी गुपचूप साखरपुडा केला; नंतर लग्न करायचं सोडून अक्षय-रवीनाचा ब्रेकअप झाला

लियोनार्डो डिकॅप्रियो आणि रसेल क्रो यांच्या सिनेमात काम करण्यास नाना पाटेकर यांनी नकार दिला होता ही माहिती प्रसिद्ध बॉलिवूड डायरेक्टर अनुराग कश्यप यानं दिली आहे. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत त्यानं हा खुलासा केलाय.  हॉलिवूड दिग्दर्शक रिडले स्कॉट याने नानांना त्याच्या 'बॉडी ऑफ लाइज' सिनेमात काम करण्याची ऑफर दिली होती. सिनेमात नानांना एका आतंकवाद्याची भूमिका देण्यात आली होती. मात्र हेच नानांना आवडलं नाही. 'आतंकवाद्याची भूमिका मला साकारायची नाही', असं म्हणून नानांनी सिनेमा करण्यास नकार दिला.

'बॉडी ऑफ लाईज' हा 2008मध्ये आलेला एक स्पाय थ्रिलर सिनेमा आहे. ज्यात लियोनार्डो डिकॅप्रियो आणि रसेल क्रो यांनी प्रमुख भूमिका केली होती.  अनुराग कश्यपनं सांगितलं, 'रिडले याने 'द पूल' हा सिनेमा पाहिला आणि त्याने मला मेल केला. ज्यात त्याला 'बॉडी ऑफ लाईज' या सिनेमासाठी नाना पाटेकर यांना कास्ट करायचं असल्याचं सांगितलं. तो मेल वाचल्यानंतर मी नानांकडे गेले त्यांना सगळं सांगितलं. पण नानांनी सिनेमातील त्यांची भूमिका ऐकून तोंडावर नाही असं सांगितलं होतं.

अभिनेता नाना पाटेकर सध्या सिनेसृष्टीपासून लांब असले तरी अनेक सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमात सक्रीय असतात. मधल्या काळात 'नटसम्राट', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' सिनेमात त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ज्या प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News