#MeToo - तनुश्री दत्ता प्रकरणी अभिनेता नाना पाटेकर यांना क्लिनचीट

#MeToo - तनुश्री दत्ता प्रकरणी अभिनेता नाना पाटेकर यांना क्लिनचीट

2018 मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर 'हॉर्न ओके प्लिज' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता.

  • Share this:

मुंबई, 16 मे : संपूर्ण जगभरात तीव्र पडसाद उमटलेल्या #Me Too चळवळीनं मागील वर्षी म्हणजेच 2018मध्ये जवळपास संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघालं होतं. या सगळ्याची सुरुवात झाली होती ती अभिनेत्री तनुश्री दत्तामुळे. तनुश्रीनं अभिनेते नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लिज' या सिनेमाच्या सेटवर आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत जवळीक साधायचा प्रयत्न केला होता असा आरोप केला होता. तनुश्रीच्या या गंभीर आरोपांनंतर बॉलिवूडमधील इतर अनेक व्यक्तींची नाव यामध्ये समोर आली होती. पण आता जवळजवळ 7 महिन्यांनंतर पोलिसांनी ठोस पुराव्या अभावी नाना पाटेकरांना क्लिनचीट दिली आहे. यासाठी पोलिसांनी 15 प्रत्यदर्शी साक्षीदारांची चौकशी केली मात्र या चौकशीमध्ये नाना पाटेकर यांच्या विरोधात एकही पुरवा न मिळाल्यानं त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

नाना पाटेकरांना पोलिसांकडून क्लिनचीट मिळाल्यानंतर तनुश्री दत्तानं यावर आपली नाराजी व्यक्त केली. ती म्हणली, 'हे 15 साक्षीदार त्या व्यक्ती आहेत जे सर्वच्या सर्व नानांचे मित्र आहेत मग हे सर्व लोक माझ्या बाजूने का साक्ष देतील. माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले आहेत हे सिद्ध करण्यासाठी मला कोणत्याही साक्षीदाराची गरज नाही. अनेकदा सत्य काय आहे हे कोर्टात सिद्ध करणं खूप कठीण होऊन बसतं. कारण आजही अनेक खोट बोलणारे लोक या जगात आहेत जे चुकीच्या लोकांची बाजू घेऊन अन्याय झालेल्या स्त्रीला खोट ठरवतात.'


तनुश्री पुढे म्हणाली, 'मी नानांविरोधात आवाज उठवल्यानंतर मला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलंच. पण ज्या लोकांनी माझ्या बाजूने साक्ष देण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना नानांच्या माणसांकडून धमकीचे फोन आले होते. त्यामुळे ह सर्वच लोक खूप घाबरलेले होते आम्ही त्यांना समजावलं पण अशी साक्ष देणं त्यांच्यासाठी धोकादायक वाटल्यानं त्यांनी नकार दिला याउलट अनेक खोट्या लोकांनी नानांच्या बाजूने साक्ष देत मला खोट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पण एवढ्याने हार मानणाऱ्यांपैकी नाही. मी लढत राहीन आणि एक दिवस नक्की जिंकेन.'

डेस्टिनेशन वेडिंगचं लोकेशन ठरवण्यासाठी युरोपला गेले होते रणबीर-आलिया ?

ऋषी कपूर यांना सरप्राइझ द्यायला न्यूयॉर्कला पोहचला 'हा' बालमित्र, नीतू कपूरनी शेअर केला फोटो

दुसऱ्या बाईकडे पाहताना अजय देवगण जेव्हा बायकोकडूनच पकडला जातो...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 10:15 PM IST

ताज्या बातम्या