तनुश्रीच्या तक्रारीवर CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर

तनुश्रीच्या तक्रारीवर  CINTAAनं पाठवलेल्या नोटिशीला नानानं दिलं हे सविस्तर उत्तर

अभिनेत्री तनुश्री दत्तानं केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांची दखल घेत CINTAA नं ( सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन )नाना पाटेकरला नोटिस पाठवली होती. या नोटिशीला नाना पाटेकर यांनी गुरुवारी सविस्तर उत्तर पाठवलं आहे. काय आहे नानाचं म्हणणं?

  • Share this:

मुंबई, १८ ऑक्टोबर : अभिनेत्री तनुश्री दत्तानं केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांची दखल घेत  CINTAA नं ( सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन )नाना पाटेकरला नोटिस पाठवली होती. या नोटिशीला नाना पाटेकर यांनी गुरुवारी सविस्तर उत्तर पाठवलं आहे.

ANIनं यासंदर्भात बातमी दिली आहे. या उत्तरामध्ये नाना पाटेकर यांनी तनुश्रींनी केलेल सगळे आरोप खोटे आणि आधारहीन असल्याचं म्हटलं आहे. आपण तनुश्री दत्ताविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही नाना पाटेकर यांनी सांगितलं आहे.

सिनेसृष्टीतील लैंगिक गैरवर्तन तसंच इतर गैरव्यवहाराच्या घटना रोखण्याची जबाबदारी निर्माते, दिग्दर्शक तसंच संबंधित संघटनांची देखील आहे. महिलांबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यास तसंच तक्रार करण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे. यादृष्टीनेच कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा, २०१३ या कायद्यानुसार सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती (आयसीसी) स्थापन करावी असे निर्देश आयोगाने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला दिले आहेत.

दरम्यान तनुश्री दत्ताने महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीचीही ९ ऑक्टोबरला दखल घेण्यात आलीये. महिला आयोगाने अभिनेता नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना नोटीस बजावत १० दिवसांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. तसंच तनुश्रीलाही या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोगासमोर स्वतः उपस्थित राहून आपले म्हणणं मांडावं असे निर्देश देण्यात आले आहेत.

तनुश्री दत्ताने आयोगाकडे दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत मुंबई पोलिसांकडे सदर प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचं म्हटलंय. मुंबई पोलिसांकडुन याबाबत आतापर्यंत काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल आयोगाने मागविला आहे.

तनुश्रीने गेल्या सोमवारी रात्री महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. नाना पाटेकर आणि गणेश आचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तिने केली होती.

First published: October 18, 2018, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading