सासूच्या निधनाने भावुक नम्रता शिरोडकर, शेअर केल्या भावना Vijaya Nirmala Death | Namrata Shirodkar

Vijaya Nirmala Death | Namrata Shirodkar | विजया निर्मला यांची सून आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरनेही तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहत विजया यांना श्रद्धांजली वाहिली.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 02:02 PM IST

सासूच्या निधनाने भावुक नम्रता शिरोडकर, शेअर केल्या भावना Vijaya Nirmala Death | Namrata Shirodkar

मुंबई, 28 जून : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची सावत्र आई आणि अभिनेत्री-दिग्दर्शिका विजया निर्मला यांचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. गुरूवारी (27 जून) गाचीबोउली, हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालायात विजया यांनी अखेरचा श्वास घेतला. महेश बाबूचे वडील कृष्णा यांच्या त्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिने सृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यामध्ये विजया निर्मला यांची सून आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरनेही तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहत विजया यांना श्रद्धांजली वाहिली.

बॉयफ्रेंडसोबत आमिर खानच्या लेकीचा रोमँटिक डान्स, VIDEO व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर ही दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूची पत्नी आहे. या नात्यांनं विजया तिच्या सासू लागतात. नम्रतानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली. तिनं लिहिलं, माझ्यासाठी त्या खूप खंबीर स्त्री होत्या. माझ्या लग्नानंतरच्या 14 वर्षांच्या प्रवासात त्या माझ्यासोबत होत्या, त्या खूप प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणाऱ्या होत्या. त्या धीट आणि त्यांच्या आयुष्यात परिपूर्ण होत्या. त्या खूप उत्साही व्यक्ती होत्या. त्यांचा दृष्टीकोण खूप दूरदर्शी होता. त्या त्यांच्या कुटुंबाच्या आधार होत्या. त्यांच्या आत्म्यास देव शांती देवो. तुम्ही आमच्या आठवणीत नेहमीच राहाल विजया निर्मला गुरु, आज तुम्ही आमच्यात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही.

‘दबंग 3’ : विनोद खन्नांच्या जागी ‘हा’ अभिनेता साकारणार सलमानच्या वडिलांची भूमिका

Loading...

 

View this post on Instagram

 

Vijay Nirmala, who has directed 44 films, was a visionary filmmaker and she made her directorial debut via 1971 Telugu film Meena. She holds a Guinness Record for most number of films directed by a female filmmaker. In 2008, the Andhra Pradesh government conferred her with Raghupathi Venkaiah award for her contribution to Telugu cinema. Members of Telugu film fraternity took to twitter to remember the veteran. Actor Jr. NTR wrote she was a "pioneering filmmaker whose life is an inspiration for many". Nirmala, is survived by her husband Krishna and her son Naresh Vijaya Krishna. Telugu superstar Mahesh Babu is her stepson. #VijayNirmala #MaheshBabu #NamrataShirodhkar #LaxmiManchu #PawanKalyan #Chiranjeevi #rip 🙏🙏🙏

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

तेलुगू सिनेमामध्ये विजया यांचं खूप मोठं योगदान आहे. 2008मध्ये त्यांना तेलुगू सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी रघुपती वेंकय्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. विजया निर्मला यांनी त्याच्या करिअरची सुरुवात अभिनेत्री म्हणून केली. महेश बाबूचे वडील अभिनेता कृष्णा यांच्याशी त्यांची दुसरा विवाह होता. कृष्णा यांच्यासोबत त्यांनी तब्बल 47 सिनेमांमध्ये काम केलं होतं आणि त्यांच्या संपूर्ण सिने करिअरमध्ये विजया यांनी जवळपास 200 सिनेमांमध्ये काम केलं. महेश बाबू व्यतिरिक्त त्यांचा दुसरा मुलगा नरेश सुद्धा अभिनय क्षेत्रात आहे.

...म्हणून सुनैनाच्या नात्याला रोशन कुटुंबीयांनी केला विरोध

===========================================================

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 01:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...