हैदराबाद, 18 मे- माजी मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर तिला ट्रोल करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. त्यांचं झालं असं की, नम्रताने सुपरस्टार महेश बाबुशी लग्न केल्यानंतर सिनेमांत काम करणं बंद केलं. तसंच ती लाइमलाइट पासूनही दूर राहत असली तरी सोशल मीडियावर ती फार सक्रीय आहे. महेशच्या अनेक सिनेमांचं प्रमोशन ती आपल्या अकाउंटवरून सातत्याने करत असते. पण तिच्या या पोस्टवर नम्रता अनेकदा ट्रोल होते.
त्याचं झालं असं की, नम्रताने पती महेश बाबूच्या महर्षि या सिनेमाच्या यशानंतर संपूर्ण कुटुंबाचा सेलिब्रेट करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. याच फोटोवरून नम्रताला ट्रोल केलं जात आहे. एका युझरने लिहिले की, ‘तू तुझ्या चेहऱ्यावर मेकअप का नाही लावत? तू नैराश्यग्रस्त आहेस का?’
आठ वर्षांपूर्वी जे झालं त्यानंतर ‘या’ अभिनेत्रीने स्वतःला गुगलवर शोधणं केलं बंद
या कमेंटनंतर नम्रताने तिला ट्रोल करणाऱ्या चांगलाच धडा शिकवला. तिने लिहिले की, ‘तुला कदाचित मेकअप करणाऱ्या मुली आवडत असतील. तुझे जे सौंदर्याचे मापदंड आहेत त्यांना तू पाहिलं पाहिजेस. तुला जे हवंय ते इथे तुला मिळणार नाही. त्यामुळे इथून दूर जाणंच तुझ्या हिताचं आहे.’
टीव्ही अभिनेत्याला पोलिसांची ‘थर्ड डिग्री’, मॉलमधून थेट रुग्णालयात
View this post on Instagram
So much love ❤️❤️❤️#celebratingmaharshi #blockbusterweekend grateful n happy
महेश बाबूचा महर्षि सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन करत आहे. या सिनेमाच्या यशानंतरचे अनेक फोटो नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या फोटोंमध्ये महेश बाबूसह बहीण शिल्पा शिरोडकर आणि अन्य सदस्यही दिसत आहेत. महर्षि हा महेश बाबूचा २५ वा सिनेमा आहे.
प्रियांका चोप्राच्या या घड्याळाच्या किंमतीत तुम्ही घेऊ शकतात चार महागड्या गाड्या
View this post on Instagram
Super duper successful #maharshi❤️❤️❤️thanku @directorvamshi for an epic blockbuster whatta night
नम्रता ही माजी मिस इंडिया असून मिस वर्ल्ड स्पर्धेत ती पाचव्या स्थानावर होती. नम्रताने १९९३ मध्ये मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने जब प्यार किसी से होता है सिनेमात छोटेखानी भूमिका साकारली होती. संजय दत्तच्या वास्तव सिनेमातून नम्रताला खरी ओळख मिळाली.
SPECIAL REPORT: चॅटिंग की फोन...मृण्मयी देशपांडेला सगळ्यात जास्त काय आवडतं?