मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

देवमाणूसच्या आमदारबाई 'बिग बॉस मराठी 4' च्या घरात, पहिल्या स्पर्धकाचं नाव आलं समोर

देवमाणूसच्या आमदारबाई 'बिग बॉस मराठी 4' च्या घरात, पहिल्या स्पर्धकाचं नाव आलं समोर

तेजस्विनी लोणारी

तेजस्विनी लोणारी

लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे 'बिग बॉस'. या शोची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. ‘बिग बॉस मराठी’ हा शो घराघरात लोकप्रिय असून सध्या हा शो प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची लोक कित्येक दिवसांपासून प्रतिक्षा करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 2 ऑक्टोबर : लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे 'बिग बॉस'. या शोची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. ‘बिग बॉस मराठी’ हा शो घराघरात लोकप्रिय असून सध्या हा शो प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची लोक कित्येक दिवसांपासून प्रतिक्षा करत आहेत. अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली असून आजपासून ‘बिग बॉस मराठी’चा चौथ्या पर्वाला सुरुवात होत आहे.

'बिग बॉस मराठी 4' च्या स्पर्धकांची नावं समोर यायला सुरुवात झाली आहे. अशातच पहिल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. तेजस्विनी लोणारी ही बिग बॉस च्या चौथ्या पर्वात सहभागी होणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ मालिकेमध्ये आमदार बाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आता बिग बॉसमध्ये सहभागी झालीये.

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

100 दिवस एकाच घरात राहून हे स्पर्धक कधी एकमेकांची काळजी घेतात तर कधी एकमेकांचा जीव देखील घ्यायला निघतात. त्यामुळे संमीश्र भावना आपल्याा या शोमधून पहायला मिळत असतात. त्यामुळेच हा शो टीआरपी रेसमधील दमदार शो समजला जातो.

दरम्यान, प्रेक्षकांना आता 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीजनची ओढ लागली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी संभाळणार आहेत.

First published:

Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment