शिधावाटप पत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज

शिधावाटप पत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज

ज्यांना अन्न सुरक्षेची गरज नाही अशा व्यक्तींनी या योजनेतून बाहेर पडण्याचं आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केलं होतं. या अवाहनाला साथ देण्यासाठी नागराजने या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

  • Share this:

20 आॅगस्ट : दिग्दर्शक नागराज मंजुळेने आपलं नाव शिधावाटप पत्रिकेतून हटवण्यासाठी करमाळ्यातील कार्यालयात अर्ज दाखल केलाय. ज्यांना अन्न सुरक्षेची गरज नाही अशा व्यक्तींनी या योजनेतून बाहेर पडण्याचं आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केलं होतं. या अवाहनाला साथ देण्यासाठी नागराजने या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

आपल्याला आता या योजनेची गरज नसल्याने आपल्या कोट्यातील अन्न एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तीला मिळावं यासाठी या योजनेतून बाहेर पडत असल्याचं त्यांने सांगितलंय. करमाळ्यातील तहसीलदार संजय पवार यांच्याकडे त्याने या योजनेतून बाहेर पडण्याबाबतचा अर्ज त्याने भरून दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2017 09:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading