'लहानपणीचा हीरो आपल्या सिनेमात', मंजुळेंची बिग बींबाबत फेसबुक पोस्ट

'लहानपणीचा हीरो आपल्या सिनेमात', मंजुळेंची बिग बींबाबत फेसबुक पोस्ट

नागराज मंजुळेंनी त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर 'दिवार' सिनेमातील बिग बींचा फोटो पोस्ट केला आहे.

  • Share this:

10 ऑगस्ट: सैराट सिनेमामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या नागराज मंजुळेंचा आगामी सिनेमा कोणता असेल आणि त्यात कोणते कलाकार असतील याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अमिताभ बच्चन नागराज मंजुळेंच्या सिनेमात प्रमुख भूमिकेत असतील अशी चर्चा होती. नुकतीचं नागराज मंजुळेंनी ही बाब सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी जाहीर केली.

नागराज मंजुळेंनी त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर 'दिवार' सिनेमातील बिग बींचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये आपल्या लहानपणीची आठवण ही नागराज मंजुळेंनी शेअर केली आहे. दिवार सिनेमातील अमिताभसारखंच नागराज मंजुळेही शर्टाला गाठ मारून शाळेत जायचे. मास्तरांचा मार खाऊनही ती गाठ सोडायचे नाहीत. तसंच अजूनही काही आठवणी त्यांनी या पोस्टमध्ये शेअर केल्या आहेत. आपल्या लहानपणीचा हीरो आता आपल्या सिनेमात काम करणार याचा नागराज मंजुळेंना खूप आनंद झाला आहे.

<

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 09:30 PM IST

ताज्या बातम्या