सैराटनंतर आता झूंड घालणार प्रेक्षकांना भूरळ! येतोय नागराजचा पहिला बॉलिवूडपट

सैराटनंतर आता झूंड घालणार प्रेक्षकांना भूरळ! येतोय नागराजचा पहिला बॉलिवूडपट

गेले अनेक महिने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘झुंड’ला अखेर प्रदर्शनाची तारीख मिळाली. येतोय नागराज मंजुळे यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या आगामी चित्रपटाचं नाव झुंड असं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार नागराज मंजुळे करत आहेत. नुकतेच त्यानं चित्रपटाचं पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहिर केली.

‘झुंड’ हा चित्रपट येत्या 18 जूनला प्रदर्शित होणार आहे. गेले अनेक महिने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. नंदी चिन्नी कुमार नामक एका व्यक्तीनं या चित्रपटावर कॉपी राईट्सचा दावा ठोकला होता.  या व्यक्तीच्या मते ‘झुंड’ चित्रपटाची कथा त्यांच्या कथेची नक्कल आहे. अर्थात हा दावा ‘झुंड’च्या निर्मात्यांनी फेटाळून लावला. परिणामी हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. अन् न्यायालयानं चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. परंतु ही बंदी अखेर उठवण्यात आली. आता हा चित्रपट येत्या 18 जूनला प्रदर्शित होणार आहे.

अवश्य पाहा - दियाच्या लग्नामुळं नवऱ्याच्या पहिल्या पत्नीला मनस्ताप, ट्रोलिंगवर दिली प्रतिक्रिया

मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले असल्यानं ‘झुंड’बद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर हा चित्रपट बेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

Published by: Mandar Gurav
First published: February 20, 2021, 9:56 AM IST

ताज्या बातम्या