नागराज मंजुळे आणि डाॅ. निलेश साबळेची रंगणार जुगलबंदी

चला हवा येऊ द्या साजरा करणार आहे नागराज मंजुळे स्पेशल आठवडा. येत्या भागात थुकरटवाडीत नाळ या झी स्टुडिओजच्या आगामी चित्रपटाची टीम येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 12, 2018 06:23 PM IST

नागराज मंजुळे आणि डाॅ. निलेश साबळेची रंगणार जुगलबंदी

मुंबई, 12 नोव्हेंबर : या आठवड्यात नागराज मंजुळेंचा नाळ सिनेमा रिलीज होतोय. ट्रेलरवरूनच सिनेमाला नागराज टच जाणवतोय. या सिनेमाची निर्मिती नागराजनं केलीय.


चला हवा येऊ द्या साजरा करणार आहे नागराज मंजुळे स्पेशल आठवडा. येत्या भागात थुकरटवाडीत नाळ या झी स्टुडिओजच्या आगामी चित्रपटाची टीम येणार आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे स्वतः अभिनय करणार आहेत. ते स्वतः या संपूर्ण टीम सोबत थुकरटवाडीला भेट देणार आहेत. तसंच नागराज मंजुळे यांची सैराट या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे ज्या कलाकारांशी नाळ जोडली गेली ते कलाकार देखील चला हवा येऊ द्या च्या मंचावर नागराज मंजुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी सज्ज झाले.


सैराटमधील परश्या, लंगड्या आणि फॅन्ड्री मधल्या जब्या हे सर्व कलाकार थुकरटवाडीत उपस्थित होते. 'चला हवा येऊ द्या'च्या विनोदवीरांनी या ऐन मोक्यावर इंडस्ट्रीतील कलाकार नागराज मंजुळे यांना शुभेच्छा द्यायला आले,  तर ते कशा प्रकारे शुभेच्छा देतील यावर एक धमाल विनोदी स्किट सादर केलं.

Loading...


त्यात कुशल आणि सागर अजय अतुल, तर भाऊ कदम आर्ची, अंकुश वाढवे सिनिअर सोनाली कुलकर्णी, भारत गणेशपुरे महेश कोठारे बनले. हे सर्व विनोदवीर त्यांच्या अभिनय कौशल्याने आणि कॉमेडी टायमिंगने सर्व रसिक प्रेक्षकांना हसून लोटपोट करण्यासाठी संपूर्ण आठवडा सज्ज होणार आहेत.


कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला.


आत्तापर्यंतच्या प्रवासात 'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच 'चला हवा येऊ द्या'चं नवीन पर्व होऊ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...