'द सायलेन्स'मध्ये नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत

'द सायलेन्स'मध्ये नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत

नागराज या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. गजेंद्र अहिरे सिनेमाचं दिग्दर्शन करतोय.

  • Share this:

26 सप्टेंबर : सैराट आणि फँड्रीनंतर नागराज मंजुळे नवा सिनेमा घेऊन येतोय. 'द सायलेन्स'. या सिनेमात नागराज पडद्यामागे नाही, तर पडद्यावरची भूमिका साकारतोय. नागराज या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. गजेंद्र अहिरे सिनेमाचं दिग्दर्शन करतोय.

नागराजसोबत सिनेमात अंजली पाटील आणि रघुवीर यादव आहेत. 'न्यूटन'मध्येही अंजलीनं भूमिका साकारलीय. हा सिनेमा सत्यकथेवर बेतलाय.

'द सायलेन्स'नं अनेक परदेशी फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावलीय. सिनेमाचं सगळीकडे कौतुक झालंय. शिवाय राज्य सरकारचे 2 पुरस्कारही मिळालेत.

या सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झालेत. सिनेमा 6 आॅक्टोबरला रिलीज होणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 05:46 PM IST

ताज्या बातम्या