बिग बींबरोबर नागराज मंजुळे चालले नागपूरला

बिग बींबरोबर नागराज मंजुळे चालले नागपूरला

नागराज मंजुळे यांचा महत्त्वाकांक्षी सिनेमा झुंड पुन्हा सुरू होतोय. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या सिनेमाचं शूटिंग नागपूरमध्ये सुरू होतंय.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : नागराज मंजुळे यांचा महत्त्वाकांक्षी सिनेमा झुंड पुन्हा सुरू होतोय. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या सिनेमाचं शूटिंग नागपूरमध्ये सुरू होतंय. बिग बी अमिताभ बच्चन हे आता ठग्स ऑफ हिंदुस्तान ह्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. त्यानंतर ते झुंडच्या शूटिंगला सुरुवात करतील.

यापूर्वी सिनेमाचं शूटिंग पुण्यात होणार होत मात्र तिथून सिनेमाचा सेट हलवण्यात आला असल्याने आता या सिनेमाचं शूटिंग नागपुरात होणारे. या सिनेमासाठी बिग बी सलग 45 दिवस शूटिंग करणार आहेत तर संपूर्ण सिनेमाचं शूटिंग शेड्युल 85 दिवसांचं असेल.

बिग बी वगळता सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट नवखी आहे. नागराज यांनी सिनेमात काम करणाऱ्या मुलांना आधीच प्रशिक्षण दिलंय. नागपूरमध्ये शूटिंग सुरू होण्यापूर्वी ही मुलं काही काळ बिग बिनसोबत घालवतील. या सिनेमाची कथा उनाड मुलांना एकत्र करून त्यांची फुटबॉल टीम तयार करणाऱ्या प्रशिक्षकांवर आधारित आहे. अमिताभ बच्चन फुटबाॅल प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत.

नागराज ह्यांनी बिग बी ह्यांनाच डोक्यात ठेवून ह्या सिनेमाची कथा लिहिली होती. अमिताभ ह्यांच्या होकारामुळे नागराज ह्यांच त्यांच्यासोबत सिनेमा करण्याचं स्वप्न पूर्ण होण्याची अशा पुन्हा जागृत झालीये. झुंड हा नागराज मंजुळेंचा पहिला हिंदी सिनेमा आहे.

नागराज यांनी बिकट परिस्थितीत  जेऊरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले आणि त्यानंतर नागराज यांचे पदवीपर्यंतचं शिक्षण जेऊर इथे झालं. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. मराठी विषयात एम.ए. करताना केशवसुत, मर्ढेकर, अरूण कोल्हटकर, नामदेव ढसाळ नव्याने भेटत गेले. अधिक जवळचे वाटत गेले. एम.फिल करत चित्रपटाचे विचार डोक्यात घट्ट बसलेले होते. सुरूवातीपासूनच नागराजला चित्रपटांची आवड होती. पुण्यात शिकत असताना त्याच्या मनात चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली.

VIDEO : लता दीदी@90 : लोक नूरजहाँ, शमशाद को भुल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे! असं कोण म्हणालं लतादीदींना?

First published: September 26, 2018, 2:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading