प्रेम… इमोशन्स… बदला… ‘नागिन 4’मध्ये उलगडणार नवी रहस्य, पाहा VIDEO

प्रेम… इमोशन्स… बदला… ‘नागिन 4’मध्ये उलगडणार नवी रहस्य, पाहा VIDEO

एकता कपूरचा शो ‘नागिन 4’बाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : एकता कपूरचा शो ‘नागिन 4’मध्ये निया शर्मा आणि जास्मिन भसीन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. या भागात कोणती नवी रहस्य असतील असा प्रश्न नागिनच्या चाहत्यांना पडला असतानाच या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत. या प्रोमोमध्ये शोमधील अनेक रहस्यांवरील पडदा उठवण्यात आला आहे. तसेच निया आणि जास्मिन यांच्या भूमिका काय असणार आहेच हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रेम आणि बदल्याची कथा आहे नागिन 4

या नव्या प्रोमोची सुरुवातच एका लग्नापासून होते. या शोमध्ये सायंतनी घोष एक इच्छाधारी नागिन आहे. पण तिचं एका माणसावर प्रेम जडतं. ती त्याच्याशी लग्न करते. त्यानंतर या दोघांच्या मुलीचा जन्म होतो. पण जेव्हा हे दोघं त्यांच्या गावी परततात काही लोक त्यांना मारुन टाकतात. ( हे लोक असतात आणि ते यांना का मारतात याचा खुलासा अद्याप झालेला नाही.)

इंटीमेट सीन शूट करताना कशी होते अवस्था, बॉलिवूड अभिनेत्यानं शेअर केला अनुभव

मात्र सायंतनी घोष त्यांच्या डोळ्यात धूळ फेकत तिथून पळून जाते. पण जास्त पुढे जाऊ शकत नाही. ती एका खोल दरीत पडते. पण त्याच वेळी तिची मुलगी तिच्या डोळ्यात त्यांच्या दुश्मनांचं प्रतिबिंब पाहते आणि इथूनच सुरू होते बदल्याची कथा.

जास्मिन भसीनच्या भूमिकेच नाव

सायंतनी हा अपघातातून वाचते. त्यानंतर ती मुलीला हातात उचलून घेते आणि म्हणते, ही मुलगी यासाठीच जन्माला आली आहे. आईचा बदला ही मुलगी पूर्ण करेल. या मुलीचं नाव असतं नयनतारा.(जास्मिन भसीन)

दुसरीकडे विजेंद्र आणि निया शर्माची एंट्री होते. निया शर्मा नागिन आहे की मानव याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण प्रोमो पाहिल्यावर लक्षात येतं की यावेळी नागिन तिचा बदला जास्तच खतरनाक पद्धतीन घेणार आहे. याशिवाय या शोमध्ये निया आणि जास्मिन यांच्यातील खास कनेक्शन सुद्धा दाखवण्यात आलं आहे. हा शो येत्या शनिवार पासून म्हणजेच 14 डिसेंबर पासून शनिवार-रविवार 8 वाजता प्रसारित होणार आहे.

रानू मंडलचं नाव ऐकताच भडकला हिमेश रेशमिया, म्हणाला...

अभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय क्रिकेटर वृषभ पंतला डेट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: tv show
First Published: Dec 12, 2019 04:53 PM IST

ताज्या बातम्या