• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Samantha पासून घटस्फोट घेतल्यानंतर Naga Chaitanya ने पहिल्यांदाच लिहिली पोस्ट, म्हटलं...

Samantha पासून घटस्फोट घेतल्यानंतर Naga Chaitanya ने पहिल्यांदाच लिहिली पोस्ट, म्हटलं...

साऊथ सुपरस्टार (South Superstar) नागा चैतन्य (Naga Chaitnya) सध्या त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ट्विटरवर #NagaChaitanya या अभिनेत्याचे नाव सकाळपासून ट्रेंड करत आहे. आणि याची अनेक कारणे आहेत.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर-   साऊथ सुपरस्टार  (South Superstar)  नागा चैतन्य  (Naga Chaitnya)  सध्या त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ट्विटरवर #NagaChaitanya या अभिनेत्याचे नाव सकाळपासून ट्रेंड करत आहे. आणि याची अनेक कारणे आहेत. एक कारण म्हणजे नागा चैतन्य आता तेलगू सिनेमानंतर OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. आणि दुसरे कारण म्हणजे अभिनेत्याने समंथापासून  (Samntha Prabhu)  घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच एखादी पोस्ट शेअर केली आहे.
  2 ऑक्टोबर रोजी समंथापासून वेगळे झाल्यानंतर नागा चैतन्यने त्याच्या इंस्टाग्रामवर प्रथमच एक पोस्ट शेअर केली आहे. तिने अलीकडेच वाचलेल्या पुस्तकाचा फोटो शेअर केला आणि त्याला 'जीवनासाठी प्रेमपत्र' असे म्हटले. या पोस्टमध्ये, अभिनेत्याने @officiallymcconaughey यांना टॅग केले आणि त्याचा प्रवास शेअर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. आणि हे त्याच्यासाठी ग्रीन सिग्नल असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वी, त्याने समंथापासून विभक्त होण्याची पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने घटस्फोटाचे कारण म्हणून परस्पर मतभेद सांगितले होते. आणि त्यानंतर तो 45 दिवस इंस्टाग्रामपासून दूर राहिला होता. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, की नागा फार कमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. आणि त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की त्यांना सोशल मीडियावर सक्रिय राहणे आवडत नाहि. कारण त्याला त्याची गोपनीयता आवडते. त्याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर आतापर्यंत फक्त 52 फोटो पोस्ट केले आहेत. ज्यापैकी बरेच समंथासोबत शेअर केले आहेत. घटस्फोटानंतर अनेक जोडप्यांनी आपल्या जोडीदारासोबतचे फोटो हटवले असले तरी चैतन्यने असे केले नाही. तरीही त्याच्या इंस्टाग्रामवर समंथासोबतचे अनेक रोमँटिक फोटो तुम्हाला पाहायला मिळतात. (हे वाचा:अनुष्का रंजनच्या मेहंदीत आलिया भट्टचा No Makeup लुक; फोटो पाहून चाहत्यांनी ....) लग्नाच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी, समंथा आणि नागा चैतन्य यांनी विभक्त होण्याची घोषणा केली. लग्नापूर्वी या जोडप्याने तीन वर्षे एकमेकांना डेट केले आहे. आणि नंतर 2017 मध्ये गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. घटस्फोटानंतर समांथाला नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबाकडून 200 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. तथापि, अभिनेत्रीने नकार दिला आणि आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आता सामंथा तिच्या करिअरला नवा ट्विस्ट देत असून तिने अनेक बॅक टू बॅक चित्रपट साइन केले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: