मुंबई,29 मार्च- साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक अशी समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांची ओळख होती. मात्र या दोघांनी अचानक घटस्फोट घेत सर्वांनाच धक्का दिला होता. दरम्यान या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा चाहते व्यक्त करत असतात. मात्र या दोघांनी आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागा चैतन्यचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. ही अभिनेत्री इतर कुणी नसून शोभिता धूलिपाला आहे. दोघांच्या अफेयर्सच्या चर्चेदरम्यान या दोघांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
नागा चैतन्य आणि समंथा प्रभूने घटस्फोट घेतल्यानंतर चाहते त्यांच्यावर नाराज झाले होते. या दोघांचा हा निर्णय चाहत्यांना अजिबात रुचला नव्हता. अनेकांनी या दोघांना एकत्र येण्याची विनंती केली होती. मात्र आता हे दोघेही आपआपल्या आयुष्यात पुढे निघून गेल्याच दिसून येत आहे. समंथाचा एक्स-पती आणि साऊथ अभिनेता नागा चैतन्य आता पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे. नागा चैतन्य प्रसिद्ध अभिनेत्री शोभिता धूलिपालाला डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
(हे वाचा: Urfi Javed: उर्फी जावेद तृतीयपंथी, स्वत: सांगावं अन्यथा...: प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा)
दरम्यान नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघेही डिनर डेटवर गेले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हा फोटो लंडनमधील एका रेस्टोरंटमध्ये क्लिक करण्यात आला आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप या दोघांनी याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाही.
या रेस्टोरंटमधील शेफ असणाऱ्या सुरेंद्र मोहन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते अभिनेता नागा चैतन्यसोबत पोझ देताना दिसून येत आहेत. या फोटोमध्ये हे दोघेच असल्याचं पहिल्या नजरेत वाटतं. मात्र फोटोला निरखून पाहिलं तर लक्षात येत की, या दोघांच्या मागे टेबलवर अभिनेत्री शोभिता धूलिपला बसलेली दिसून येत आहे. हा फोटो समोर येताच त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.
समंथा प्रभूपासून विभक्त झाल्यापासूनच नागा चैतन्यचं नाव शोभिता धूलिपलासोबत जोडलं जात आहे.अनेकवेळा याबाबत दोघांनाही विचारणा करण्यात आली आहे. मात्र दोघांनीही आपल्या नात्याबद्दल मौन बाळगलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, South indian actor