मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बाहुबली' फेम Anushka Shetty सोबत Naga Chaitanya च्या एंगेजमेंटवर नागार्जुनीची अशी होती प्रतिक्रिया

बाहुबली' फेम Anushka Shetty सोबत Naga Chaitanya च्या एंगेजमेंटवर नागार्जुनीची अशी होती प्रतिक्रिया

नागा चैतन्य(Naga Chaitanya) पत्नी समंथा (Samantha Ruth Prabhu) प्रभूसोबत घटस्फोट घेतल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नागा चैतन्य एकेकाळी 'बाहुबली' फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत (Anushka Shetty) रिलेशनशिपमध्ये होता.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 18 नोव्हेंबर- Naga chaitanya engagement rumours with Anushka shetty:  नागा चैतन्य(Naga Chaitanya) पत्नी समंथा (Samantha Ruth Prabhu) प्रभूसोबत घटस्फोट घेतल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नागा चैतन्य एकेकाळी 'बाहुबली' फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत (Anushka Shetty) रिलेशनशिपमध्ये होता. असे म्हटले जाते की, अनुष्का नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांना आपला गुरू मानत होती. नागार्जुनने अनुष्कासोबत ' ‘डॉन’, ‘रागदा’, ‘थंडवम’, ‘ओम नमो वेंकटेशया’, ‘केडी’, ‘किंग’, ‘केडी’, ‘सोगगड़े चिन्नी नयना’ और ‘ऊपिरी’ आणि 'अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नागा चैतन्यसोबत अनुष्का शेट्टीच्या एंगेजमेंटच्या अफवांवर नागार्जुनने (Akkineni Nagarjuna) 2017 मध्ये एका मुलाखती दरम्यान प्रतिक्रिया दिली होती. हैदराबाद टाइम्सला दिलेल्या थ्रोबॅक मुलाखतीत, मुलगा नागा चैतन्य आणि अनुष्का शेट्टीच्या एंगेजमेंटच्या अफवांवर नागार्जुन म्हणाले होते की, 'ज्यावेळी ही अफवा पसरली तेव्हा तो (नागा चैतन्य) स्वित्झर्लंडमध्ये शूटिंग करत होता. त्याचवेळी मी त्याला पहाटे फोन केला आणि म्हणालो, 'अरे, काल रात्री तुझी अनुष्काशी एंगेजमेंट झाली आणि तू मला सांगितलेही नाहीस...' तो म्हणाला, ' खरच...' आणि मोठ्याने हसला. मी अनुष्कालाही फोन केला आणि आम्ही सगळे खूप हसलो.

वाचा : 'आई कुठे काय करते' मालिकेस TRP त मागे टाकत ही मालिका ठरली नंबर -1

सामंथासोबत घटस्फोटाच्या बातम्या येत असताना, चैतन्यने वेगळे झाल्यानंतर स्वतःसाठी नवीन अपार्टमेंट खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. चैतन्य लवकरच त्याच्या घरी शिफ्ट होणार आहे तर समंथा गचीबोवलीच्या हवेलीत म्हणजेच तिच्या जुन्या घरात राहणार आहे. MIRCHI9 च्या वृत्तानुसार, चैतन्यने हैदराबादच्या एका पॉश परिसरात नवीन घर विकत घेतले आहे. चैतन्यचे नवीन घर जुबली हिल्स परिसरात आहे आणि सध्या त्याचे नूतनीकरण केले जात आहे. नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर चैतन्य येथे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाचा : ऋता दुर्गुळेच्या आयुष्यात खास व्यक्तीची एंट्री; इन्स्टावरून दिली प्रेमाची कबुली

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या पूजा हेगडे आणि अखिल अक्किनेनीसोबत त्याच्या 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. याशिवाय तो आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' आणि विक्रम कुमारच्या 'थँक यू' या चित्रपटातही दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Tollywood