कल्याणचा नचिकेत लेले ठरला सारेगमपचा महाविजेता

कल्याणचा नचिकेत लेले ठरला सारेगमपचा महाविजेता

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम सारेगमपच्या १३व्या पर्वाचा ग्रँण्ड फिनाले नुकताच मुंबईत पार पडला. सलग १० तास लाईव्ह पार पडलेल्या या महाअंतिम सोहळ्यात कल्याणचा नचिकेत लेले हा विजेता ठरला.

  • Share this:

08 जानेवारी : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम सारेगमपच्या १३व्या पर्वाचा ग्रँण्ड फिनाले नुकताच मुंबईत पार पडला. सलग १० तास लाईव्ह पार पडलेल्या या महाअंतिम सोहळ्यात कल्याणचा नचिकेत लेले हा विजेता ठरला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या १२ गायकांमध्ये ही स्पर्धा रंगली. प्रत्येक फेरीअंती त्यातील एका स्पर्धकाला वगळण्यात आलं. अखेर अंतिम पाच जणांमध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी रंगली.

यातील कल्याणचा नचिकेत लेले, पुण्याचा अक्षय घाणेकर आणि यवतमाळचा उज्ज्वल गजभर यांची अंतिम तीन स्पर्धकांमध्ये निवड झाली होती. अखेरीस प्रेक्षक आणि परीक्षकांचा कौल लक्षात घेता नचिकेतच्या नावाची महाविजेता म्हणून घोषणा करण्यात आली. तर अक्षय आणि उज्ज्वल यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

यावेळी अक्षय कुमार आणि सोनम उपस्थित होते. अक्कीनं ढगाला लागली कळं

दोन महिने रंगलेल्या या स्पर्धेत गायिका बेला शेंडे, दिग्दर्शक रवी जाधव आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांनी परीक्षकांची भूमिका बजावली.तर ख्यातनाम निवेदक अभिनेते अन्नू कपूर हे महाअंतिम सोहळ्याचे विशेष अतिथी होते.

First published: January 8, 2018, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading