वयाच्या 17 वर्षीच जुळ्या मुलांची आई झाली होती Nach Baliye 9 ची 'ही' स्पर्धक

मुलांच्या जन्मानंतर वर्षभरातच नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर ही अभिनेत्री मुलांना एकटी सांभाळते.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 10:11 AM IST

वयाच्या 17 वर्षीच जुळ्या मुलांची आई झाली होती Nach Baliye 9 ची 'ही' स्पर्धक

मुंबई, 20 जुलै : स्टार प्लसवर नुकताच सुरु झालेला Nach Baliye चा नवा सीझन बराच चर्चेत आहे. या सीझनच्या आगळ्या वेगळ्या थीमनं यंदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यंदा या शोमध्ये फक्त कपलच नाही तर एक्स कपल सुद्धा डान्स करताना दिसणार आहेत. पण या एक्स कपलमधील उर्वशी ढोलकीया आणि अनुज सचदेव सध्या खूप चर्चेत आहे. अनुजसोबत नच बलियेमध्ये सहभागी होणाऱ्या उर्वशी ढोलकियानं इंट्रोच्या वेळी तिच्या पर्सनल लाइफ बद्दल सांगितलं ज्यामुळे तिची चर्चा सर्वत्र होत आहे.

मलायकाचा तिरस्कार करतो अरबाज खान? घटस्फोटानंतर असं आहे दोघांमधील नातं

स्टार प्लसवरील शो ‘कसौटी जिंदगी की’मधून कोमौलिकाच्या भूमिकेत दिसलेल्या उर्वशीला तिच्या पर्सनल आयुष्यात अनेक कसोट्या पार कराव्या लागल्या आहेत. याविषयीचा खुलासा तिनं पहिल्यांदाच नच बलियेच्या सेटवर केला. आपल्या पर्सनल लाइफ बद्दल उर्वशी म्हणाली, ‘वयाच्या 16 व्या वर्षी माझं लग्न झालं होतं आणि लग्नानंतर लगेच पुढच्या वर्षी म्हणजे वयाच्या 17 व्या वर्षी मी आई जुळ्या मुलाची आई झाले. त्यांनतर वर्षभरातच मी नवऱ्यापासून वेगळी झाले आणि तेव्हापासून मी माझ्या मुलांना एकटी सांभाळते.’

पहिल्याच सिनेमानं केली होती ऑस्करवारी, एकेकाळची सुपरस्टार ‘ती’ सध्या काय करते?

Loading...

यावेळी तिच्या मुलांनीही तिचं कौतुक केलं. ते म्हणाले, आई दुसरं लग्न करू शकली असती मात्र तिच्यासाठी तिचं कुटुंब सर्वात आधी येतं. त्यामुळे तिनं कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.

मुलांच्या बोलण्यानंतर उर्वशी काहीशी भावुक झालेली दिसली. नच बलियेमध्ये सहभागी होण्याआधी उर्वशीनं सलमानसमोर एक अट ठेवली होती. ती अशी की, तिच्या आणि अनुज नात्याला या शोमध्ये कोणत्याही प्रकारचा टॅग लावला जाणार नाही. सलमाननं तिची ही अट मान्य केली आणि सांगितलं की, असं काहीही होणार नाही.

अभिनेता श्रेयस तळपदेनं दिला The Lion King साठी आवाज, हे आहे ‘गोड’ कारण

==========================================================

SPECIAL REPORT: मॉबलिंचिंगने बिहार हादरलं; चोरीच्या संशयातून तिघांची निर्घृण हत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 10:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...