पैशांसाठी काहीही कराल का, नेटीझन्स भडकले

पैशांसाठी काहीही कराल का, नेटीझन्स भडकले

शोमध्ये प्रत्येक आठवड्यात स्पर्धकांमध्ये महामुकाबला होतो. नेमकी हीच गोष्ट प्रेक्षकांना धरून ठेवते.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट- टीव्हीवरील डान्स रिअलिटी शो नच बलिये 9 सध्या प्रेक्षकांचा आवडता शो होत आहे. शोमध्ये प्रत्येक आठवड्यात स्पर्धकांमध्ये महामुकाबला होतो. नेमकी हीच गोष्ट प्रेक्षकांना धरून ठेवते. घराघरात या शोची चर्चा होते. मात्र शोचा सूत्रसंचालक मनिष पॉलला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्याचं झालं असं की एका व्हिडिओमध्ये मनीष पॉलने जोडीचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर अशी काही रिअक्शन दिली की त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.

फैजल खान आणि मुस्कान कटारिया यांनी ‘आंखें मेरी हर जगह’ या गाण्यावर भन्नाट परफॉर्म केलं. फैजल- मुस्कानच्या परफॉर्मन्सनंतर रवीना टंडनने त्यांचं कौतुक केलं. तर शोचा सूत्रसंचालक मनीष पॉलनेही फैजल- मुस्कानचं भरभरून कौतुक करत म्हटलं की, ‘याआधीही अनेक परफॉर्मन्स झाले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे परफॉर्मन्स पाहिले. पण मी शर्तीने सांगू शकतो की, भारतीय टीव्हीसृष्टीत असा परफॉर्मन्स पहिल्यांदा झाला असेल.’

या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लोकांनी मनीषच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली. एका युझरने लिहिले की, असा परफॉर्मन्स पहिल्यांदा होत नाहीये. दुसऱ्या युझरने लिहिले की, असा परफॉर्मन्स याआधी सुपर डान्सर शोमध्ये झाला असून याहून जास्त चांगला झाला आहे. यानंतर अजून एका युझरने लिहिले की, मनीष चॅनलकडून पैसे मिळतात म्हणून काहीही बोलणार का. याला कोणी तरी डान्स इंडिया डान्स दाखवा. अनेक नेटकऱ्यांनी मनीषच्या या कमेंटवर आक्षेप घेतला आणि सोशल मीडियावरच त्याला सुनावले.

मनसेसमोर अभिनेता अक्षय कुमारची माघार, Mission Mangal चं यू-टर्न

हॉटेलमधून शॅम्पूच्या बाटल्या चोरायची दीपिका, बेस्ट फ्रेंडने सांगितलं गुपित

करण जोहरच्या 'ड्रग पार्टी'विरोधात आमदाराने लिहिलं Open Letter

बॉलिवूडच्या या 5 कपल्सनी सर्वांसमोर दिली होती नात्याची कबुली

विद्या बालनच्या आयुष्यात नवी 'कहाणी' पाहा हा VIDEO

Published by: Madhura Nerurkar
First published: August 3, 2019, 6:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading