‘नच बलिये’च्या सेटवर पहिल्या दिवशीच राडा, अभिनेत्रीनं घातल्या शिव्या

‘नच बलिये’च्या सेटवर पहिल्या दिवशीच राडा, अभिनेत्रीनं घातल्या शिव्या

नुकतीच या शो च्या शूटिंगला सुरुवात झाली असून शूटिंगच्या पहिल्याच दिवशी सेटवर एका एक्स कपलमध्ये भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

मुंबई, 7 जुलै : डान्स रिअ‍ॅलिटी शो 'नच बलिये' सध्या सगळीकडे खूपच चर्चेत आहे. या शोचा 9 वा सीझन लवकरच प्रेक्षाकंच्या भेटीला येत आहे. आतापर्यंत या शोमध्ये फक्त कपल्सचाच समावेश स्पर्धक म्हणून करण्यात आला होता मात्र यंदा ही थीम थोडी वेगळी असणार आहे. या सीझनमध्ये एक्स कपल्सनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या एक्स कपल्ससाठी पुन्हा एकदा एकत्र काम करणं सोपं नक्कीच नाही आहे. नुकतीच या शो च्या शूटिंगला सुरुवात झाली असून शूटिंगच्या पहिल्याच दिवशी सेटवर एका एक्स कपलमध्ये भांडणं झाल्याचं पाहायला  मिळालं. ज्यामुळे सेटवर खूप ड्रामा झाला आणि शूट काही काळासाठी थाबवण्यात आलं होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार नुकतंच ‘नच बलिये 9’च्या सेटवर एक्स कपल मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंह यांच्यात भांडण झालं.  पहिल्या एपिसोडच्या शूटिंग दरम्यान मधुरिमा आणि विशालमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरून वाद सुरू झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की मधुरिमानं एक्स बॉयफ्रेंड विशालला सेटवरच शिव्या द्यायला सुरुवात केली. यामुळे सेटवर मोठ्या प्रमाणावर ड्रामा झालेला पाहायला मिळाला.

Birthday Special : साक्षीच्या आधी महेंद्रसिंग धोनीनं ‘या’ अभिनेत्रींना केलंय डेट

 

View this post on Instagram

 

😘

A post shared by Madhurima Tuli (@madhurimatuli) on

विशाल आणि मधुरिमा यांच्यात मैत्रीची सुरुवात ‘चंद्रकांता’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. सुरुवातीची मैत्री नंतर प्रेमात बदलली. पण त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि लवकरच दोघंही वेगळे झाले. त्यामुळे ऑफस्क्रीन झालेल्या या भांडणाचा ऑनस्क्रीन काय फरक पडतो हे पाहणं गंमतीशीर असणार आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी का म्हणतेय ‘कुछ तो लोग कहेंगे’?

 

View this post on Instagram

 

🙋🏻#Repost @vishalsingh713 with @get_repost ・・・ Angel & demon #chandrakantaoncolors

A post shared by Madhurima Tuli (@madhurimatuli) on

'नच बलिये'चा हा सीझन यावेळी सलमान खान प्रोड्युस करत आहे आहे. त्यामुळे या सीझनसाठी अशी हटके थीम ठेवण्यात आली आहे. याशोमधील स्पर्धकांच्या इंट्रोडक्शनसाठी रणवीर दीपिकाला बोलवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय यासाठी अभिनेत्री मौनी रॉयचं नावही समोर आलं आहे.

EXCLUSIVE : 'संभाजी' मालिकेत अनाजी पंतांचा झाला अंत, पाहा PHOTOS

=============================================================

EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

First published: July 7, 2019, 12:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading