प्रसिद्ध अभिनेत्रीला रुममेटनं केली बेदम मारहाण, काचेच्या ग्लासनं चेहरा केला खराब!

प्रसिद्ध अभिनेत्रीला रुममेटनं केली बेदम मारहाण, काचेच्या ग्लासनं चेहरा केला खराब!

टीव्ही अभिनेत्रीनं तिच्या रुममेटनं तिला मारहाण केल्याचा धक्कादायक खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : टीव्ही अभिनेत्री नलिनी नेगी हिनं तिच्या रुममेटने तिला मारहाण केल्याचा धक्कादायक खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला. नलिनीची रुममेट प्रीती राणा आणि तिची आई यानी नलिनीवर प्राणघातक हल्ला केला होता. या दरम्यान त्यांनी ग्लासचा वापर केला. ज्यामुळे नलिनीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. नलिनी म्हणाली, त्या दोघींनी मला खूप मारहाण केली. त्या दोघीही माझ्या चेहर्यावर पुनपुन्हा हल्ला करत होत्या. मी एक अभिनेत्री आहे. त्यामुळे माझा चेहरा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी मुद्दाम माझा चेहरा बिघडवण्याचा प्रयत्न करत होत्या.

टीव्ही मालिका ‘नामकरण’ फेम नलिनी नेगी हिनं नुकतंच ‘स्पॉटबॉयई’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला हा भयानक प्रकार सांगितला. याबाबत तिनं ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वेब पोर्टलनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नलिनी आणि प्रीती काही वर्षांपासून एकमेकांच्या रुममेट आहेत. त्यामुळे त्या खूप वेळा एकमेकींसोबतच असत. मात्र काही महिन्यांपूर्वी नलिनीनं घर बदण्याचा निर्णय घेतला आणि ती ओशिवारामध्ये 2BHK फ्लॅटमध्ये राहायला गेली. त्यानंतर त्या घरात प्रीती एकटीच राहिली. त्यानंतर काही दिवसांनी प्रीतीनं नलिनीला ओशिवारामधील तिच्या घरी काही दिवस ठेऊन घेण्याची विनंती केली.

ज्याचं गाणं गात रानू झाली सुपरस्टार, 'तो' रिअल हिरो मात्र राहिला दुर्लक्षित

 

View this post on Instagram

 

Live the life you love 💖. 📸 @vikaschaurasia Edited by @shazzalamphotography #photoshoot #photography #picoftheday #instastyle #instafashion #trendy #diva #happiness #blessed #shooting #actorslife #loveforfashion #posing

A post shared by Nalini Negi (@nalininegi) on

नलिनी सांगते, काही दिवस तिनं माझ्यासोबत राहण्यासाठी विचारलं त्यावर मी तयार झाले. माझ्याकडे 2BHK होता म्हणून माझ्या प्रायव्हसीचा काही प्रश्न नव्हता. मी हा फ्लॅट माझ्या आई-वडीलांसोबत राहण्यासाठी घेतला होता. मात्र काही दिवसांसाठी ते दिल्लीतील माझ्या बहीणीकडे राहायला गेले होते.

 

View this post on Instagram

 

The eyes are the window of the soul ... 📸 @shazzalamphotography

A post shared by Nalini Negi (@nalininegi) on

नलिनी पुढे म्हणाली, मी तिला सांगितलं की काही दिवसात माझे आई-बाबा येतील त्यावेळी तुला ही रुम सोडून जावं लागेल. त्यावेळी ती तयार सुद्धा झाली. काही दिवसांनी तिची आई सुद्धा इथं राहायला आली. मला वाटलं त्या आपल्या मुलीच्या मदतीसाठी आल्या आहेत. मात्र मागच्या आठवड्यात त्यांनी अचानक माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली. मी ज्यावेळी जिमला जात होते त्यावेळी त्या मला अश्लील शब्दात शिव्या देऊ लागल्या. माझ्यावर वाईट कमेंट करू लागल्या. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही. त्यांनी मुलगी प्रीतीला फोन करून माझ्याबद्दल तक्रार केली. प्रीती घरी येऊन माझ्यावर चिडली. मी जेव्हा तिला संपूर्ण परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. तर तिनं माझ्यावर हल्ला केला.

SPECIAL REPORT: रानू यांच्या आवाजाने सलमानला अश्रू अनावर, केली 'ही' मदत

 

View this post on Instagram

 

“Fashions fade , Style is eternal. “ 📸 @shazzalamphotography

A post shared by Nalini Negi (@nalininegi) on

नलिनी सांगते, ‘प्रीती राणाच्या आईनं एक ग्लास उचलून माझ्या चेहऱ्यावर मारला. त्यानंतर त्या सतत माझ्या चेहऱ्यावर ग्लासने वार करू लागल्या. मी खाली पडले. तसं त्या दोघीही माझ्या अंगावर पडून मला मारु लागल्या. सुदौवानं मी वाचले नाहीतर त्यानी माझा चेहरा खराब करण्याचा आणि मला मारण्याचा पूर्ण प्लान केला होता. माझ्यावर झालेल्या या हल्ल्याबाबत समजल्यावर माझे आई-बाबा मुंबईला आले. त्यानंतर मी या दोघींबाबत तक्रार दाखल केली.’ नलिनीच्या या खुलाशावर प्रीती राणानं मात्र अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

31 Golden Years Of Salman Khan : भाईजानचे असे फोटो जे तुम्ही कधीच पाहिले नसतील!

==========================================================

SPECIAL REPORT: रानू यांच्या आवाजाने सलमानला अश्रू अनावर, केली 'ही' मदत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 12:35 PM IST

ताज्या बातम्या