लॉकडाऊनमुळे 'नागिन 4' फेम अभिनेत्रीचं लग्न रखडलं, आता सतावतेय घराच्या EMI ची चिंता

लॉकडाऊनमुळे 'नागिन 4' फेम अभिनेत्रीचं लग्न रखडलं, आता सतावतेय घराच्या EMI ची चिंता

सायंतनी आणि तिचा बॉयफ्रेंड अनुग्रह तिवारी मागच्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 मे : कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो 'नागिन 4' मधील सायंतनी घोषसाठी हे लॉकडाऊन बऱ्याच अडचणी घेऊन आलं आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिनं सध्या तिला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर आता तिचं लग्नही रखडल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षाच्या अखेरीस सायंतनी घोष लग्नाच्या बेडी अडकण्याची तयारी करत होती मात्र कोरोना व्हायरसमुळे सध्या जी परिस्थिती निर्माण केली आहे त्यामुळे तिनं हे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर तिला सध्या तिच्या सेविंग्स आणि घरच्या EMI ची चिंता सतावतेय.

सायंतनीनं 'नागिन 4' मध्ये मान्यताच्या भूमिकेत दिसली होती. नुकत्याच एका मुलाखतीत सायंतनीनं या लॉकडाऊनचे तिच्यावर किती वाईट परिणाम झाले हे सांगितलं. ती म्हणाली, प्रत्येकाच्या जीवनात एक प्लानिंग असतं. हे सर्व तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती आणि त्याबद्दलचं प्लान बघूनच करता. नागिन 4 मध्ये माझी भूमिका नुकतीच संपली होती आणि मी माझ्या नव्या कामाच्या अगोदर 1 महिना ब्रेक घेते. सुरुवातीला मला सर्व ठीक वाटलं. पण आता माहित नाही काय होईल. सध्याची परिस्थिती बघता हे शूट पुन्हा लवकर सुरू होणं कठीण आहे. त्यामुळे सध्या मला माझं घर आणि गाडीच्या EMI ची काळजी वाटतेय.

 

View this post on Instagram

 

For me, becoming isn’t about arriving somewhere or achieving a certain aim. I see it instead as forward motion, a means of evolving, a way to reach continuously toward a better self. The journey doesn’t end. And as they say it isn't the destination but the journey that matters !!!! 🌸.......Thank u @ektarkapoor @muktadhond @varunthebabbar @colorstv for a beautiful journey called #naaginbhagyakaazehreelakhel . #manyata will always be special !! ❤️..... Thank u n gratitude to the universe for giving me #naagin again ! Life has indeed come a full circle 😇 and a big thank you to my fans n audience for forever showering so much of appreciation n love to me ..means the world -♥️❤️................................#gratitude#manyata #naagin4#naaginbhagyakaazehreelakhel#originalnaagin#firstnaaginoftv#sayantanighosh #actor#actorslife#instagrammers#instagrammer#instagood#instamood#lovemyjob#lovemyjob#lovemylife#beautifuljourney#everyjourneymustend#thankyougod#thankyouuniverse#happyweekend#happysaturday#saturday#saturdayvibes#saturdaymood#saturdaymorning#saturdaymotivation#weekend#weekendmood#weekendvibes 🌸

A post shared by Sayantani (@sayantanighosh0609) on

सायंतनीला जेव्हा तिच्या लग्नाच्या प्लान विषयी विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, मी सध्या लग्नाबाबत अजिबात विचार केलेला नाही. सध्या लोक याबाबत विचार करत नाही आहेत. कारण हा व्हायरस कधी संपणार हे कोणालाच माहित नाही. पण मी आणि अनुग्रह दोघंही एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्हाला सेटल व्हायचं आहे. पण त्यासाठी आम्हाला आधी पाहावं लागेल की सोशली काय काय शक्य आहे आणि काय नाही. सध्या तरी लग्नाचा विचार केलेला नाही मात्र जर केलंच तर करू वर्चुअल लग्न आणि कधीतरी जाऊन रजिस्ट्री करून येऊ. त्यानंतर तुम्हाला कळेलच.

सायंतनी आणि तिचा बॉयफ्रेंड अनुग्रह तिवारी मागच्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सायंतनी टीव्ही अभिनेत्री आहे तर अनुग्रह एक फिटनेस ट्रेनर आहे. 'नागिन 4' व्यतिरिक्त सायंतनीनं 'कुमकुम', 'महाभारत', 'इतना करो न मुझे प्‍यार' आणि 'नामकरण' या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती 'बिग बास 6' ची स्पर्धक सुद्धा आहे.

First published: May 13, 2020, 8:06 AM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या