मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /गुरू रंधावा बरोबरच्या 'मिस्ट्री गर्ल' कोण? नवीन वर्षात शेअर केलेल्या फोटोचा झाला खुलासा

गुरू रंधावा बरोबरच्या 'मिस्ट्री गर्ल' कोण? नवीन वर्षात शेअर केलेल्या फोटोचा झाला खुलासा

गुरू रंधावाने (Guru randhawa) काल सोशल मीडियावर (Social media) एक फोटो (Photo) शेअर केला होता, ज्यामध्ये तो एका मुलीबरोबर नाचताना (Dancing with girl) दिसत आहे. आता या फोटोतली मुलगी कोण होती, याचा खुलासा झाला आहे.

गुरू रंधावाने (Guru randhawa) काल सोशल मीडियावर (Social media) एक फोटो (Photo) शेअर केला होता, ज्यामध्ये तो एका मुलीबरोबर नाचताना (Dancing with girl) दिसत आहे. आता या फोटोतली मुलगी कोण होती, याचा खुलासा झाला आहे.

गुरू रंधावाने (Guru randhawa) काल सोशल मीडियावर (Social media) एक फोटो (Photo) शेअर केला होता, ज्यामध्ये तो एका मुलीबरोबर नाचताना (Dancing with girl) दिसत आहे. आता या फोटोतली मुलगी कोण होती, याचा खुलासा झाला आहे.

मुंबई, 08 जानेवारी: गुरू रंधावा हे नाव आता केवळ पंजाबी इंडस्ट्री पुरतं मर्यादीत राहिलं नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही मोठं नाव झालं आहे. 'तुम्हारी सुलु' आणि 'साहो' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये सुंदर गाणी दिल्यानंतर गुरू खूपच प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळं तरुणांमध्ये त्याची क्रेझ वाढली. सध्या गुरू रंधवाला 2 कोटीपेक्षा अधिक लोक सोशल मीडियावर फॉलो करतात. त्याच्या प्रत्येक कामांवर त्यांच बारिक लक्ष असतं. काल गुरू रंधावाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका मुलीबरोबर नाचताना दिसत आहे. या फोटोला गुरूने एक कॅप्शनही लिहिलं आहे- "नवीन वर्ष, नवीन सुरुवात!"

गुरूने हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी विविध अंदाज लावायला सुरुवात केली. गुरूचं एकतर लग्न झालं असावं  किंवा तो यावर्षी लग्नाच्या बेडीत अडकेल, अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर पाहायला मिळाल्या. नोरा फतेही, जॅकलिन फर्नांडिस यांसारख्या अनेक बड्या सेलिब्रिटींनीही गुरुच्या या फोटोवर शुभेच्छा दिल्या. चाहत्यांना गुरू सोबतच्या त्या मुलीचा चेहरा पहायचा होता. संबंधित फोटोत गुरूसोबत फोटोमधली ती रहस्यमय मुलगी कोण आहे? याचे अनेक अंदाज चाहत्यांकडून आणि मीडियाकडून लावले जात होते. त्याच्या या फोटोला 9 लाखाहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

खरंतर या फोटोमध्ये गुरूसोबत दिसलेली मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून बॉलीवूड अभिनेत्री संजना संघी आहे. या प्रकरणाचा खुलासा करताना गुरूने दुसरा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत संजना संघीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. गुरूने हा फोटो शेअर करताना लिहिलं की- "नवीन वर्षात, संजना सांघीसोबत नवीन गाणं." गुरूने हा फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांच्या कल्पनांची निराशा झाली आहे. बादशाहांसारख्या बर्‍याच सेलिब्रिटींनी या फोटोवर स्माईली शेअर केल्या आहेत. त्यांचे चाहते आता असं म्हणत आहेत की, गुरु रंधावाने जानेवारी महिन्यातच लोकांना 'एप्रिल फुल' बनवलं आहे.

संजना सांघीने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या शेवटच्या 'दिल बेचारा' या चित्रपटातून केली होती. तर गुरु रंधावा त्याच्या गाण्यांव्यतिरिक्त अलिकडेच एका वादामुळे चर्चेत आला होता.  कोविड -19 च्या नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Song