मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Myra Vaikul: बाप्पाच्या गाण्यावर थिरकली चिमुकली मायरा; परीच्या हुकस्टेपनं वेधलं लक्ष

Myra Vaikul: बाप्पाच्या गाण्यावर थिरकली चिमुकली मायरा; परीच्या हुकस्टेपनं वेधलं लक्ष

बालकलाकार मायरा वैकुळ तर सगळ्यांची आवडती बनली आहे. अशातच आपल्या आवडत्या परीनं म्हणजेच मायरानं गणपती बाप्पाच्या गाण्यावर क्युट हुकस्टेप तयार केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 28 ऑगस्ट: 'माझी तुझी रेशीमगाठ' ही छोट्या पडद्यावरील मालिका लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना भरभरुन प्रेम मिळत असतं. या मालिकेतील छोटीशी परी म्हणजेच बालकलाकार मायरा वैकुळ तर सगळ्यांची आवडती बनली आहे. अशातच आपल्या आवडत्या परीनं म्हणजेच मायरानं गणपती बाप्पाच्या गाण्यावर क्युट हुकस्टेप तयार केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

मायरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'माझा आवडता देव बाप्पा आहे लय भारी' गाण्यावरचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्यावर तिनं स्वतःची डान्स स्टेप बसवली आहे. व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं की, 'ही हुकस्टेप फॉलो करत या गाण्यावर रील बनवा'. तिचा क्युट डान्स व्हिडीओ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडीओला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत.

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झालेला नव्हता. त्यामुळे यंदा सगळीकडे आनंद, जल्लोष मोठ्या प्रमाणावर दिसतोय.

हेही वाचा -  गणेशोत्सवानिमित्त मालिकेतील बालकलाकारांना मिळाली झक्कास भेट, समोर आला सुंदर VIDEO

दरम्यान, मायराचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे ती नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू असते. ती वेगेवेगळ्या थीमवर फोटो, व्हिडीओ बनवते. तिच्या आईवडिलांसोबतही ती ट्विनिंग कपडे घालून फोटोशूट करते. मायराच्या हस्यानं ती चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडते त्यामुळे अगदी लहानग्या वयात तीनं मोठं नाव कमावलं आहे.

First published:

Tags: Ganesh chaturthi, Marathi entertainment, Social media, Tv serial