मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'मी केलेले ट्वीट चुकीचे नाही', कंगनाने पोलिसांना दिला जबाब

'मी केलेले ट्वीट चुकीचे नाही', कंगनाने पोलिसांना दिला जबाब


राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे वांद्रे पोलिसांनी कंगना विरोधात दाखल केले.

राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे वांद्रे पोलिसांनी कंगना विरोधात दाखल केले.

राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे वांद्रे पोलिसांनी कंगना विरोधात दाखल केले.

मुंबई, 08 जानेवारी : राजद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रानावत (kangana ranaut) आणि तिची बहिणी रंगोली चंदेल  (rangoli chandel)  अखेर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये (Bandra police station) जबाब नोंदवण्यासाठी दाखल झाली होती. यावेळी'माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील असं मला वाटतं नाही' असं उत्तर पोलिसांना दिले.

कंगणा रणौत आणि तिची बहिण रंगोली चंदेल या दोघींनी आपला जबाब वांद्रो पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला आहे.  जवळपास 2 तास दोघींची  पोलिसांनी चौकशी केली.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनल्यावर एलन मस्क यांची 'Strange' प्रतिक्रिया

या दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये जबाब देताना “आपण केलेले ट्वीट काही गैर नाही, ट्विटर हे एक सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे, त्यामुळे तिथे अनेक ट्विट केले जातात माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, असं मला वाटत नाही' असं उत्तर तिने पोलिसांना दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काय आहे प्रकरण ?

राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे वांद्रे पोलिसांनी कंगना विरोधात दाखल केले आहेत. कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू नंतर मोठ्या प्रमाणात ट्वीट केले होते. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीने वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होवून न्यायालयाने कंगना विरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते.

GATE परीक्षेचं Admit Card आलं; कसं आणि कुठून कराल डाउनलोड?

त्यानुसार, वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा नोंदवून दोघींना चौकशी करता तसंच जबाब नोंदवण्याकरता हजर राहण्याची नोटीस धाडली होती. पण कधी नातेवाईकांच्या लग्नाचे तर कधी कोविड -19 चे कारण देत कंगणा पोलीस स्टेशनच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली होती आणि थेट या गुन्ह्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाने आज कंगना आणि तिच्या बहिणीला चौकशी करता हजर राहण्याचे आदेश दिले होते.

पण, 3 ते 4 वेळा नोटीस पाठवूनही कंगनाने याकडे दुर्लक्ष केले होते. पण, आज स्वत: कंगना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. आता पोलीस पुढे काय कारवाई करता हे पाहण्याचे ठरणार आहे.

First published: